AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटवर पैशांची मागणी

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने भामट्याने 'एसपी यवतमाळ' हे खोटे फेसबुक अकाऊंट तयार केले होते. (Yawatmal SP Fake Facebook account)

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटवर पैशांची मागणी
यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या नावे खोटे फेसबुक अकाऊण्ट
| Updated on: Apr 27, 2021 | 11:15 AM
Share

यवतमाळ : पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्या फेसबुक मित्रांकडे पैशांची मागणी करणाऱ्या भामट्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘एसपी यवतमाळ’ नावाने फेक अकाऊंट तयार करुन फेसबुक फ्रेंड्सकडे पैशांची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला होता. महत्त्वाचं म्हणजे यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा फोटो सुद्धा बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला होता. (Yawatmal SP Dr Dilip Patil Bhujbal Fake Facebook account accuse demands money)

बनावट अकाऊंटवरुन भामट्याची चॅटिंग

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात भामट्याने ‘एसपी यवतमाळ’ नावाने एक नवीन फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यासाठी त्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरले. त्यानंतर त्या अकाऊंटवरुन चॅटिंग सुरु करण्यात आली.

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा

पोलीस अधीक्षकांचे मित्र आणि नातेवाईकांशी मेंसेंजरद्वारे संपर्क साधत आपण आर्थिक अडचणीत आल्याचे भामट्याने सांगितले. मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर त्याने पैशांची मागणी सुरु केली. हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, अशी मागणी त्याने केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा असे मेसेज अनेकांना केले. या प्रकारामुळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली.

मित्राला संशय आल्याने तक्रार

त्यावेळी एसपी यवतमाळ नावाने बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी ते बनावट अकाऊंट तात्काळ बंद केले. त्यानंतर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

यवतमाळ शहर पोलिसांनी बनावट अकाऊंट बनवणाऱ्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणी यवतमाळ जिल्हा सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर बनावट अकाऊंट बंद केले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येत असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबईतील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, ऑनलाईन पैसे पाठवण्याची मित्रांकडे मागणी

कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप

(Yawatmal SP Dr Dilip Patil Bhujbal Fake Facebook account accuse demands money)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.