प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, बहिणीचेही केले अपहरण

प्रेवविवाह केल्याचा राग मनात धरत तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाथाबुक्क्या तसेच हॉकीस्टिकने तरुणाला मारहाण करत त्याच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. तशी तक्रार तरुणाने दिली आहे.

प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, बहिणीचेही केले अपहरण
प्रातिनिधिक फोटो

बारामती : प्रेवविवाह केल्याचा राग मनात धरत तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाथाबुक्क्या तसेच हॉकीस्टिकने तरुणाला मारहाण करत त्याच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. तशी तक्रार तरुणाने दिली आहे. या मारहाणीमध्ये तरुण जखमी झाला असून त्याचे नाव विठ्ठल माळवदकर असे आहे. (young love marriage couple beaten by girl brother case registered in baramati pune)

मारहाण करुन पत्नीचे अपहरण केले

मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाने आपल्याच नात्यातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला. या विवाहाला तरुणीच्या घरच्यांचा विरोध होता. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केले होते. दोघांचाही संसार आनंदात सुरु होता. हे दोघेही सामानाची खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते. मात्र तरुणीचा चुलत भाऊ प्रशांत गायकवाड तसेच गोपीनाथ गायकवाड, पप्पू कवडे आणि राहुल खरात यांनी दोघांवरही अचानकपणे हल्ला केला.

लाथाबुक्क्या तसेच हॉकिस्टिकने मारहाण

तसेच माळवदकर यांना काठी, लाथाबुक्क्या तसेच हॉकिस्टिकने मारहाण केली. त्यानंतर माळवदकर यांच्या पत्नीलादेखील मारहाण करत तिला जबरदस्ती गाडीमध्ये बसवले. त्यानंतर माळवदकर यांच्या पत्नीला घेऊन चारही आरोपी निघून गेले. तसा आरोप माळवदकर यांनी केलाय. या घटनेनंतर एकच चर्चा सुरु असून माळवदकर यांनी चारही आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत .

प्रेमविवाह केलेला तरीही पत्नीचा निघृण खून

दरम्यान, सततच्या भांडणाला आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना 6 सप्टेंबर रोजी ठाण्यात घडली होती. आरोपीचे पूर्ण नाव शाहनवाज सैफी असं आहे. तो आपली पत्नी सदफ सैफी आणि दोन वर्षांच्या मुलीसह मुंब्र्यातील जीवन बाग बुरहाणी इमारतीत राहत होता. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीसोबत प्रेमविवाह केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रचंड वाद होत होते. त्यांची वारंवार भांडणं व्हायची. 1 सप्टेंबरलादेखील त्यांच्यात असंच भांडण झालं होतं. याच भांडणानंतर आरोपी शाहनवाजने पत्नीला थेट संपवण्याचा कट आखला.

खून नेमका कसा केला ?

त्यासाठी त्याने पत्नीला आधी झोपेचं औषध दिलं होतं. त्यानंतर पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या तोंडात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पाईप टाकला. तिच्या देहाला ठिकठिकाणी जाळलं. त्यानंतर घराच्या दरवाज्याला लॉक लावून तो आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडला होता. पत्नीच्या हत्येनंतर तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी जाण्यासाठी निघाला होता. त्यासाठी तो एक्सप्रेसने निघाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला मध्येच अटक केलं होतं.

इतर बातम्या :

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं, हत्येचा उलगडा होताच खळबळ

कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी, तीन गाड्यांची तोडफोड, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

(young love marriage couple beaten by girl brother case registered in baramati pune)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI