नखं उपटली, शरीरावर बेदम माराचे वळ, पत्नी ‘त्याच्यासोबत’ दिसताच पतीचं डोकंच फिरलं..
दिल्लीत एका पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. पत्नीसोबत आढळलेल्या हृतिक वर्मा नावाच्या तरुणाला पतीने क्रूरपणे मारहाण केली, त्याची नखे उपटली.

राजधानी दिल्लीमध्ये एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तेथे एका परुषाने त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत, परपुरूषासोबत पाहिलं आणि त्याचं डोकंच फिरलं, मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांचाच भीतीने थरकाप उडाला. पत्नी दुसऱ्या तरूणासोबत दिसताच संतापलेल्या पतीने त्या तरूणालाच बेदम मारहाण केली. त्याची नखं उपटली. त्याला एवढी क्रूर वागणूक देण्यात आली की गंभीर जखमी झालेल्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही भयानक घटना घडली. हृतिक वर्मा असे मृत तरूणाचे नाव असून तो आरोपीच्या पत्नीसोबत आपत्तीजनक स्थितीत पकडला गेला. त्यानंतर आरोपीने त्याला बेदम मारहाण केल्याने त्याचा जीवच गेला.
नेमकं काय झालं ?
ईशान्य दिल्लीचे डीसीपी राकेश पावरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मृत तरूण हृतिक वर्मा हा आरोपीच्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत पकडला गेला. आपल्याच घरात आपलीच पत्नी दुसऱ्या एका तरूणासोबत आपत्तीजनक अवस्थेत दिसल्यानंतर तिचा पती प्रचंड संतापला. त्याने मागाचा पुढचा काहीच विचार न करता त्याची स्वत:ची पत्नी आणि तो तरूण हृतिक याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ”
शरीरावर होते मारहाणीचे वळ, मृताच्या कुटुंबियांचा दावा
मृत तरूण हृतिकचे काका बंटी यांच्या सांगण्यानुसार, आरोपीने त्याच्या पुतण्याला बेदम मारहाण केली. त्याची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही, तर आरोपीने त्याची नखं उपटली, आणि त्याला बेदम चोप दिला. त्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे वळ होते, असा दावा त्याच्या काकांनी केला.
टेम्पोचालक होता हृतिक
एक शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची स्वत:ची पत्नी आणि हृतिक दोघांवरही हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. केवळ आरोपीनेच नव्हे तर इतरही अनेक लोकांनी हृतिकला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. मृत हृतिक हा टेम्पोचालक होता आणि त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून घरावर शोककळा पसरली आहे.
सकाळी क्रूरपणे मारहाण, रात्री मृत्यू
या मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच दिवसा पोलीस घटनास्थळी पोहोचले , मात्र तेव्हा जखमीला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात नेलं होतं. पण उपचारांदरम्यानच रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून आरोपीच्या शोधासाठी विविध पथके पाठवण्यात आली आहेत.
