सख्खा भाऊच ठरला वैरी, लहान भावाने मोठ्या भावाला पेट्रोल टाकून पेटवलं

धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा केल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत घडला.

सख्खा भाऊच ठरला वैरी, लहान भावाने मोठ्या भावाला पेट्रोल टाकून पेटवलं

बारामती : वेगेळं राहण्याच्या कारणावरुन सख्ख्या धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत घडला. तालुक्यातील सुपे गावाजवळ काळखैरेवाडी राजबाग याठिकाणी हा प्रकार घडला आहे (Younger Brother Threw Petrol On The Older Brother ).

मारुती वसंत भोंडवे (वय 48) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा लहान भाऊ अनिल वसंत भोंडवे (वय 32) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या तो फरार आहे. बुधवारी (12 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

काळखैरेवाडी येथील राजबाग परिसरात हे दोघेही भाऊ एकत्र राहत होते. मारुती भोंडवे यांच्यासह पत्नी सविता, मुलगा महेश आणि हर्षद बुधवारी रात्री घरात झोपले असताना अनिल त्यांच्या घराजवळ आला. घराजवळ येऊन मारुती भोंडवे यांना म्हणाला, “तू वेगळा रहा, आमच्यात राहू नकोस”. यानंतर त्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या, घराच्यादाराची कडी बाहेरुन लावली. त्याने मारुती यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने खिडकीतून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

यावेळी मारुती यांच्या अंगावरील पेटलेले कपडे विझवण्यासाठी पत्नी सविता त्याठिकाणी आल्या. अनिल यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यानांही अनेक ठिकाणी भाजले. त्यांची आरडाओरडा ऐकून इतरांच्या मदतीने मारुती यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मारुती हे गंभीररीत्या भाजल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले (Younger Brother Threw Petrol On The Older Brother ).

गुरुवारी (13 रोजी) पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. या जबाबानंतर मारुती भोंडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे बारामती तालुकासह परिसरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वेगळे राहण्याचा कारणावरुन सख्ख्या भावाला पेटवून देऊन त्याची हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात प्रथमच घडल्याने सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करत आहेत.

Younger Brother Threw Petrol On The Older Brother

संबंधित बातम्या :

जालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा

पुण्यात पाच वर्षांपूर्वी 50 लाखांची घरफोडी, पोलिसांकडून नाट्यमय उकल, दोन अट्टल चोरटे ताब्यात

अमरावतीत हत्येता थरार, घरात घुसून युवकावर चाकू हल्ला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *