ठाणे महापालिकेच्या कोव्हिड-19 रुग्णालयात मुन्ना भाई एमबीबीएस, पालिका अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं

रुग्णालयात कोव्हिड रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे बोगस आहेत, अशी घटना समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या कोव्हिड-19 रुग्णालयात मुन्ना भाई एमबीबीएस, पालिका अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं

ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोरोना रुग्णालयात बोगस डॉक्टर पकडण्यात आल्याची (Fake Doctor In Thane COVID-19 Hospital) धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात आली आहे (Fake Doctor In Thane COVID-19 Hospital).

कोव्हिडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि गरीब रुग्णांना कोव्हिड रुग्णालय उपलब्ध व्हावे, यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महापालिकेने जवळपास अकराशे खाटांचे ग्लोबल कोव्हिड रुग्णालय उभे केले. रुग्णांना त्याचा फायदाही झाला आणि हे रुग्णालय ठाण्यात संजिवनी ठरले.

परंतु, आता याच रुग्णालयात कोव्हिड रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे बोगस आहेत, अशी घटना समोर आली आहे. यापैकी दोघे इंटरशिप पूर्ण न केलेले, तर एक डॉक्टर हा विद्यार्थी आहे. अशा तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकारी यांनी पकडून त्यांच्या बद्दल अहवाल तयार करुन पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. या रुग्णालयात डॉक्टर देण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आणि त्याच्याकडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर याबाबत आम्ही चौकशी सुरु आहे, अशी उडती उत्तरं पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करवाई झाली पाहिजे आणि चौकशीअंतर्गत जर हे तीनही डॉक्टर चुकीचे असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेता नजीब मुल्ला यांनी केली आहे.

Fake Doctor In Thane COVID-19 Hospital

संबंधित बातम्या :

TRP Scam | गुन्हा रद्द करता येणार नाही, सीबीआयकडे प्रकरण वर्ग होणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका

तीन दिवसात तीन हत्या; उपराजधानी हादरली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *