बनावटी तूप मोठ्या ब्रॅण्डच्या नावाने विकणारी टोळी गजाआड, कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

बनावट तूप तयार करुन विकणाऱ्या एका टोळीचा कल्याण क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

बनावटी तूप मोठ्या ब्रॅण्डच्या नावाने विकणारी टोळी गजाआड, कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

मुंबई : बनावट तूप तयार करुन विकणाऱ्या एका टोळीचा कल्याण क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात नामांकीत कंपनीचे लेबल लावून बनावट तूपाची विक्री करीत होती. या छाप्यात पोलिसांनी 200 किलो तूप जप्त केले आहे.( Fake Ghee seller gang arrested by kalyan crime branch Fake Ghee gang Kalyan)

कल्याण क्राईम ब्रँचचे पोलिस कर्मचारी दत्ताराम भोसले यांना डोंबिवलीतील टिळकनगर परिसरात अल्पेश नावाचा एक तरुण तूप विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. अल्पेश हा मोठा नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट तूप विक्रीचा धंदा करीत होता. कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांनी पोलीस अधिकारी नितीन मुकदूम, भुषण दायमा या पोलीस अधिकाऱ्यांचा नेतृत्वात एक पथक तयार करून, टिळकनगर परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी आलेल्या अल्पेश कडून पोलिसांनी बनावटी तूप जप्त करून, त्याला ताब्यात घेतले आहे.

200 किलो बनावटी तूप हस्तगत

क्राईम ब्रांचच्या पथकाने दहिसर येथील तूपाच्या गोदामवरदेखील छापा टाकला. त्या गोदामातून 200 किलो बनावटी तूप हस्तगत करण्यात आले आहे. या गोदामात लायन डालडा, सोयाबीन तेल आणि तूपाचा फ्लेवर असलेले तूप तयार केले जात होते. हे बनावटी तूप तयार करुन त्यावर अमूल, गोदावरी, कृष्णा या नामांकीत कंपन्यांच्या नावाचे लेबल लावून बाजारात विकले जात होते. गेल्या एक वर्षापासून हा काळाबाजारीचा धंदा सुरु होता.

छापेमारीत क्राईम ब्रँचने बनावटी तुपाचा धंदा करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चंद्रेश मिरानी, अल्पेश गोड, जिमित गठानी, सौद शेख आणि धनराज मेहता या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी मिरा भयंदर, पालघर, दहीसर, वसई विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या सर्व ठिकाणी बनावटी तूप विकत होती. या प्रकारामुळे दुकानदारांसोबत ग्राहकांचीदेखील फसवणूक सुरु होती. बनावटी तुपाने नागरिकांच्या शरीरावर किती विपरित परिणाम झाला असेल, याचा काही अंदाज नाही. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मित्राची हत्या, हत्येनंतर कल्याण क्राईम ब्रांच ऑफिससमोर पान विक्री, पोलिसांनी शिताफीने छडा लावला

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार

( Fake Ghee seller gang arrested by kalyan crime branch Fake Ghee gang Kalyan)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *