AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी येथे हॉटेल आकाशमध्ये अज्ञात 3 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 1 लाख 10 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Robbery in Hotel Akash in Palghar).

आधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट
| Updated on: Oct 01, 2020 | 8:06 AM
Share

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी येथे हॉटेल आकाशमध्ये अज्ञात 3 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 1 लाख 10 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Robbery in Hotel Akash in Palghar). विशेष म्हणजे लुटीदरम्यान, हॉटेल मालक आणि काही कामगारांनी विरोध केल्यानंतर लुटारुनी त्यांच्यावर रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळीबार करुन लुटमार करणारे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

हॉटेलवरील दरोड्याची ही घटना मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कासा आणि तलासरी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

बुधवारी (30 सप्टेंबर) रात्री अज्ञात तीन जण हुंडाई आय 10 कारने हॉटेल आकाशवर आले होते. त्यांनी अगोदर येऊन पाहणी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री हॉटेलवर येऊन त्यांनी हॉटेल कॅशिअरकडून पैसे लुटले. पैसे लुटून पळत असल्याने मालक आणि काही कामगारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही.

मालक आणि काही कामगारांनी दरोडेखोर ज्या गाडीतून पलायन करण्याचा प्रयत्न करत होते त्यावर शक्य होईल तसा मिळेल त्या वस्तूने हल्ला चढवत विरोध केला. हॉटेल मालक आणि कामगारांना गाडीची चावीही काढून घेण्यात यश आलं. यानंतर दरोडेखोरांनी गाडी सोडून पलायन केलं. यामध्ये गाडीचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी गोळीबारीतील दोन गोळ्या हस्तगत केल्या आहेत. अज्ञात लुटारुंचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

हॉटेल लूट प्रकरणानंतर पुन्हा एकदा हॉटेल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. रात्रभर सुरु राहणारे महामार्गावरील अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही कॅमरेही बंद असल्याचे आढळून येत आहे. यानंतर आता महामार्गावरील हॉटेल रात्री 12 नंतर बंद ठेवावेत, अशीही मागणी जोर धरु लागली आहे.

हेही वाचा :

लॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसार

हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला

जालन्यात सहा जणांकडून शेतवस्तीतील घरावर दरोडा, एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास

Hotel Akash Robbery on Mumbai Ahmedabad Highway in Palghar

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.