Nagpur Crime | नागपुरात कुख्यात गुंड बाल्या वंजारीचा खून, जिल्ह्यात 11 दिवसात 11 खून

नागपुरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीचा खून करण्यात आला आहे.

Nagpur Crime | नागपुरात कुख्यात गुंड बाल्या वंजारीचा खून, जिल्ह्यात 11 दिवसात 11 खून

नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली (Nagpur Murder Cases) आहे. कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीचा खून करण्यात आला आहे. नागपुरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीचा खून करण्यात आला आहे. बाल्याची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी घटनास्थळावरुनच रंगेहात अटक केली (Nagpur Murder Cases) आहे.

बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते. बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते. आज पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्या ठिकाणी असल्याची माहिती समजताच नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून त्याचा निर्घृण खून केला.

महिनाभरापूर्वी बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. याच वादातून बाल्या बंजारीचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे (Nagpur Murder Cases).

नागपुरात हत्येचं सत्र सुरुच

नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 11 घटना घडल्या आहेत. तर नागपूर शहरात आठ जणांचा खून करण्यात आला आहे.

Nagpur Murder Cases

संबंधित बातम्या :

पोलीस ठाण्यातच धारदार शस्त्राने हत्या, साताऱ्यातील थरारक घटना

नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या, तीन संशयित ताब्यात

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *