नालासोपाऱ्यात नायजेरियन तरुणाचा मृत्यू, नायजेरियन जमावाकडून 27 वाहनांची तोडफोड

नायजेरियन तरुणाच्या मृत्यूने संतापलेल्या काही नायजेरियन तरुणांनी तब्बल 27 वाहनांची तोडफोड केली (Nigerian People Vehicle Vandalism). नालासोपारा पुर्व प्रगती नगर परिसरात बुधवारी (17 ऑक्टोबर) पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

नालासोपाऱ्यात नायजेरियन तरुणाचा मृत्यू, नायजेरियन जमावाकडून 27 वाहनांची तोडफोड

मुंबई : नायजेरियन तरुणाच्या मृत्यूने संतापलेल्या काही नायजेरियन तरुणांनी तब्बल 27 वाहनांची तोडफोड केली (Nigerian People Vehicle Vandalism). नालासोपारा पुर्व प्रगती नगर परिसरात बुधवारी (17 ऑक्टोबर) पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या वाहनांमध्ये रिक्षा, टॅक्सी, टँकर, बाईक या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे (Nalasopara Vehicle vandalism).

जोसेफ या नायजेरियन तरुणाचा मंगळवारी (16 ऑक्टोबर) रात्री महापालिकेच्या रुग्णालात अकस्मात मृत्यू झाला (Nalasopara Nigerian People). त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, जोसेफच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त झालेल्या काही नायजेरिअन नागरिकांनी नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली. नायजेरियन तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्सी, टँकर, दुचाकी या वाहनांवर मोठमोठे दगड फेकले (Nalasopara Vehicle vandalism). दांड्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये तब्बल 27 वाहनांचं नुकसान झालं आहे. तसेच, काही नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे (Nalasopara Nigerian destroyed vehicles).

या प्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत, तर नायजेरियन जोसेफच्या अकस्मात मृत्यूचीही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

जोसेफ या नायजेरियन नागरिकाला येथील स्थानिक तरुणांनी जबर मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं असता तेथे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आमचे नागरिक संतापले आणि त्यांनी वाहनांची तोडफोड केली, असं नायजेरियन नागरीक दाऊदने सांगितलं. तसेच त्यांची या घटनेचा निषेधही केला.

नायजेरियन नागरिकांचे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे आहेत आणि त्यांचा त्रास नागरिकांना होतो, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे.

या परिसरात काही नायजेरियन नागरिक राहतात. मात्र, या घटनेनंतर ते आता घरा बाहेर निघू शकत नाहीत. कारण, त्यांना स्थानिक नागरिकांची भीती वाटत असल्याचं नायजेरियन पदाधिकाऱ्याने सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *