फटाके फोडत असताना रहिवाशांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला, 6 जण जखमी

नशा करायला बसलेल्यांना विरोध केला म्हणून दोन गर्दुल्लयांनी मीरारोडमधील काही रहिवाशांवर तलवारीने वार करत मारहाण केली आहे. यात 6 रहिवाशी जखमी झाले (druggist attack in mira road) आहेत.

attack in miraroad, फटाके फोडत असताना रहिवाशांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला, 6 जण जखमी

भाईंदर : नशा करायला बसलेल्यांना विरोध केला म्हणून दोन गर्दुल्लयांनी मीरारोडमधील काही रहिवाशांवर तलवारीने वार करत मारहाण केली आहे. यात 6 रहिवाशी जखमी झाले (druggist attack in mira road) आहेत. मीरारोडमधील गीता नगरमधील फेज 8 मध्ये ही घटना घडली आहे. या दोन्ही गर्दुल्लांना स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत (druggist attack in mira road) आहे.

मीरा रोडमधील नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गीता नगर फेज 8 मध्ये सचिन आणि रोहन सिंग हे दोघे भाऊ राहत होते. रविवारी (27 ऑक्टोबर) दोघे भाऊ कामावरुन घरी परतत होते. शोएब अल्ताफ शेख (45) आणि मोहम्मद नौमान आरिफ सय्यद (26) हे दोघेही इमारतीच्या प्रवेशद्वारावर दोन गर्दुल्ले गांजा ओढत असताना सापडले.

त्यावेळी सचिन आणि रोहनने या दोन्ही गर्दुल्ल्यांना हटकले. मात्र त्या गर्दुल्ल्यांनी सचिनला शिवीगाळ करत त्याच्या नाकावर ठोसा मारुन त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतर सचिनने घरी जाऊन रामनारायण सिंग यांना याबाबत (druggist attack in mira road) सांगितले.

याशिवाय या दोन्ही गर्दुल्ल्यांनी दिवाळी निमित्ताने इमारतीखाली फटाके फोडण्यासाठी रहिवाशांना विरोध केला. त्यावेळी एकाने तलवार आणत ती हातात नाचवत रहिवाशांना विरोध केला. त्यानंतर एकाने रोहनच्या डोक्यावर तलवारीचा वार केला. यानंतर संदीप चंद्रगिरी, राकेश मिश्र आणि पुनीत कुमार या रहिवाशांनाही या गर्दुल्ल्यांनी तलावारीच्या वाराने जखमी केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *