AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court Recruitment 2025: सुप्रीम कोर्टात भरती, महिन्याचं वेतन 67700 रुपये, कसा कराल अर्ज?

Supreme Court Recruitment 2025: सुप्रीम कोर्टात मास्टर (शॉर्टहँड) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवार यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. पदासाठी निवड लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादींद्वारे केली जाईल. सुवर्ण संधी आहे फायदा द्या...

Supreme Court Recruitment 2025: सुप्रीम कोर्टात भरती, महिन्याचं वेतन 67700 रुपये, कसा कराल अर्ज?
फाईल फोटो
| Updated on: Sep 01, 2025 | 12:24 PM
Share

Supreme Court Recruitment 2025: आताच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या युगात प्रत्येकाला चांगल्या नोकरीची नितांत गरज असते. तर एक संधी आहे, ज्या संधीचं तुम्ही सोनं करु शकता… सुप्रीम कोर्टात मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबरपर्यंत SCI च्या अधिकृत वेबसाइट sci.gov.in वर भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण 30 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. म्हणून उशीर न करता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज दाखल करा.

एकूण जागांपैकी 16 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 4 जागा अनुसूचित जाती (SC) साठी, 2 पदे अनुसूचित जमाती (ST) साठी आणि 8 पदे इतर मागासवर्गीय (OBC) साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता काय असावी आणि निवड कशी केली याबद्दल जाणून घेऊ…

कोण करु शकतं अर्ज?

अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. यासोबतच, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द आणि कंप्यूटर टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित स्टेनोग्राफी किंवा सेक्रेटरी पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 30 ते 45 वर्षांच्या मध्ये असलं पाहिजे.

अर्ज करण्यासाठी मुल्य?

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अवलंबितांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. हे पेमेंट युको बँक पेमेंट गेटवे द्वारे करता येईल. अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे.

कशी होणार उमेदवारांची निवड आणि किती मिळणार वेतन?

निवड प्रक्रिया चार श्रेणींमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात आधी शॉर्टहँड टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर एक ऑब्जेक्टिव्ह टाईप लिखित परीक्षा होणार आहे. तिसऱ्या श्रेणीत कंप्यूटर टायपिंग स्पीड टेस्ट होणार त्यानंतर सर्वात शेवटी मुलखत होईल… निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये सुरुवातीचं वेतन असेल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.