सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या उद्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी ‘हे’ मोठे नियम

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे उद्यापासून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहे. यासाठी सीबीएसईकडून काही सूचना या विद्यार्थ्यी, पालक आणि शाळांसाठी देण्यात आल्या आहेत. ज्या फाॅलो कराव्या लागणार आहेत.

सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या उद्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी 'हे' मोठे नियम
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 2:45 PM

मुंबई : 1 जानेवारी 2024 पासून केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी देखील अभ्यासाला लागल्याचे बघायला मिळतंय. नुकताच आता सीबीएसईकडून या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जी विद्यार्थ्यांना फाॅलो करावी लागणार आहेत. फक्त विद्यार्थीच नाही तर शाळांना देखील या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची देखील तयारी ही करावी लागणार आहे.

10 वी आणि 12 वीच्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा या 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. त्यापूर्वी आता उद्यापासूनच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा या द्याव्या लागणार आहेत. सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अभ्यासक्रम आणि कोणत्या विषयांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात आहे, याची माहिती विद्यार्थ्यांनी ठेवावी.

हेच नाही तर प्रात्यक्षिक परीक्षांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल याची शाळांना खात्री करावी लागणार आहे. प्रयोगशाळांमध्ये पुरेशा सुविधा आहेत की नाही याचीही खात्री शाळांना करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सीबीएसईकडून विद्यार्थ्यां अत्यंत महत्वाच्य सूचना या देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फाॅलो कराव्या लागणार आहेत.

विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला येताना कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने किंवा मोबाईल सोबत आणू नये. तसेच विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला येताना शाळेच्या ड्रेसमध्येच यावे. इतर कोणत्याही ड्रेसमध्ये जर विद्यार्थी आला तर त्याला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रवेश हा दिला जाणार नाही. ही सूचना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची नक्कीच आहे.

विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाने नियुक्त केलेल्या बाह्य परीक्षकाद्वारेच घेतली जाणार आहे. या प्रात्यक्षित परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेच्या पंधरा मिनिटे अगोरदर पोहचावे लागेल. प्रात्यक्षिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.