तुम्हाला माहितीयं का? या वरच्या वाऱ्याचं गूढ आजही लोकांना घाबरवतं, जाणून घ्या धक्कादायक गोष्टी
उत्तराखंडमधील स्थानिक लोककथांमध्ये वारंवार वरच्या वाऱ्यांचा उल्लेख येतो, जिथे रहस्यमय शक्ती वाऱ्याद्वारे त्यांच्या प्रदेशांचे रक्षण करते असा तेथील स्थानिक लोकांचा विश्वास आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण वरच्या वाऱ्यांबद्दल जाणून घेऊयात.

उत्तराखंडमधील स्थानिक लोककथा आणि श्रद्धांमध्ये गूढ दुष्ट आत्म्यांचा उल्लेख बराच काळापासून आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की डोंगर भागांमध्ये वरच्या हवेचा आणि त्याच्यांशी संबंधित जोडलेल्या असाधारण घटनांमध्ये आचारी आणि भराडी नावाच्या वन परीमध्ये दिव्य आत्मांचा वास असल्याचं बोललं जातयं अशा गूढ रहस्यमयी घटना उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने तेहरी जिल्ह्यातील खैत पर्वत प्रदेशात ज्याला स्थानिक लोकं परींची भूमी देखील म्हणतात, खूप प्रचलित आहेत. उत्तराखंडच्या स्थानिक लोककथांमध्ये वरच्या वाऱ्यांचा गूढ पैलू आढळून येतो.
परीकथा
उत्तराखंडच्या लोककथेनुसार खैत पर्वताच्या नऊ शिखरांवर नऊ बहिणी राहतात असे मानले जाते, ज्यांना स्थानिक लोकं आंचरी किंवा वनदेवी म्हणून ओळखले जाते. या बहिणी खैत पर्वताच्या नऊ शिखरांवर अदृश्यपणे राहतात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की हे दैवी आत्मे आजूबाजूच्या परिसराचे आणि गावांचे रक्षण करतात. उत्तराखंडमधील हे वरच्या वाऱ्यांच गूढ बहुतेकदा परींच्या उपस्थितीचे किंवा हालचालीचे लक्षण म्हणून पाहिले जातात. स्थानिक लोकं कधीकधी वाऱ्याचा येणारा जोरदार आवाज आणि रात्रीच्या वेळी मुलींच्या हसण्याच्या आवाज यासर्वांचा संबंध परींशी जोडतात.
रहस्यमय शक्तींपासून संरक्षणाचे नियम
ज्या ठिकाणी अशी लोकांची मान्यता असते. तेव्हा त्या ठिकाणी काही नियमांचे पालन करणे गरजेचं असतं. मान्यतेनुसार, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर परी त्यांना इजा करतील आणि त्यांना परीच्या विश्वात घेऊन जातात. स्थानिक लोकं असेही म्हणतात की अशा डोंगराळ भागात चमकदार कपडे घालणे योग्य मानले जात नाही, कारण असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
आजही उत्तराखंडमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे सूर्यास्तानंतर थांबणे किंवा आवाज करणे निषिद्ध आहे, कारण तो काळ नकारात्मक उर्जेचा आणि परींचा काळ मानला जातो. स्थानिक कथा असेही सांगतात की जर कोणी खैत पर्वतावरील फळे किंवा फुले सोबत नेली तर ती त्वरित कोमेजून जातात आणि खराब होऊ शकतात. उत्तराखंडमधील डोंगरावरील वरचे वारे हे केवळ सामान्य हवामानशास्त्रीय घटनेचा भाग न होता, तर निसर्ग आणि मानव यांच्यातील प्राचीन आध्यात्मिक संबंधाचे प्रतीक आहेत, जिथे स्थानिक शक्ती नैसर्गिक घटनांद्वारे त्यांची उपस्थिती जाणवतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
