CTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे.

CTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली
CBSE Board
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:57 PM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी ही घोषणा 3 जून रोजी केली होती. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळानं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची मुदत 7 वर्षांवरुन कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईनं याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. (CBSE extends CTET validity of certificate from 7 years to lifetime)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एनसीटीईच्या नोटीसनंतर सीबीएसईनं हे परिपत्रक जारी केलं आहे. टीईटी प्रमाणपत्र यापूर्वी 7 वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरलं जायचं. शिक्षकांची नेमणूक करताना टीईटी प्रमणापत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. सीटीईटीच्या यापूर्वीच्या प्रमाणपत्रांवर ती 7 वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असतील, असा उल्लेख असेल ती प्रमाणपत्र आता आयुष्यभरासाठी वैध असतील.

सीबीएसई नवी प्रमाणपत्र देणार नाही

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नव्यानं प्रमाणपत्र देणार नाही. जुनीच प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध असतील.

सीबीएसईकडून सीटीईटी परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून नोकरी करता येते. केंद्र सरकारच्या किंवा सीबीएसईच्या कक्षेत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या वर्गाच्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. जुलै आणि डिसेंबर दरम्यान होणारी परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती.

शिक्षक आणि उमेदवारांना मोठा दिलासा

शासकीय शाळांमधील शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आणि ज्या शिक्षकांनी यापूर्वी टीईटीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल पण मुदत संपली असेल त्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 2011 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्र आयुष्यभर वैध असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री हा निर्णय शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारा असल्याचं म्हणाले.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा घेण्यासाठी हट्ट का?, धनंजय कुलकर्णींना कोर्टाची विचारणा, याचिका मागे घेतल्याने निकाली

बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

(CBSE extends CTET validity of certificate from 7 years to lifetime)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.