कोरोना वाढतोय सीबीएसईच्या परीक्षा स्थगित करा, ‘या’ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी

मनीष सिसोदिया यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रात्याक्षिक परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली.Manish Sisodia cbse practical exam

कोरोना वाढतोय सीबीएसईच्या परीक्षा स्थगित करा, 'या' राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
सीबीएसई

नवी दिल्ली: देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीएसईच्या प्रात्याक्षिक परीक्षा 20 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा बोर्डाला दिला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे दिल्लीत यापूर्वीच सरकारी आणि खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. (Delhi Deputy CM Manish Sisodia demanded to postpone cbse board practical exam due to corona)

प्रात्याक्षिक परीक्षा स्थगित करण्याची मागणी

नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रात्याक्षिक परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली. मनीष सिसोदिया यांनी सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या बहिस्थ परीक्षकांना परीक्षण करण्यास स्थगिती देण्याचा सल्ला दिल्ली सरकारच्या शाळांना दिल्याचं त्यांनी मह्टलं.

प्रियांका गांधींनी सीबीएसएई बोर्डाला सुनावलं

प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन सीबीएसई बोर्डावर निशाणा साधला. सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गंधी यांनी केली. याशिवाय विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीनं परीक्षांचं नियोजन करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

प्रियांका गांधींनी सीबीएसईला फटकारलं, कोरोना रुग्ण वाढताना परीक्षा घेणं बेजबाबदारपणा असल्याचं सुनावलं

बोर्ड परीक्षा रद्द करा, 1 लाख विदयार्थ्यांची मागणी

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या:

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण

Delhi Deputy CM Manish Sisodia demanded to postpone cbse board practical exam due to corona