AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील सर्वात महागडी शाळा, पहिलीपासून बारावीपर्यंतचा खर्च किती? कसे मिळते ॲडमिशन?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश कसा मिळवायचा? जाणून घ्या नीता अंबानी यांनी स्थापन केलेल्या या शाळेची फी, प्रवेश प्रक्रिया आणि जागतिक दर्जाच्या सुविधांची याबद्दल सर्वकाही

मुंबईतील सर्वात महागडी शाळा, पहिलीपासून बारावीपर्यंतचा खर्च किती? कसे मिळते ॲडमिशन?
Dhirubhai Ambani International School
| Updated on: Apr 01, 2026 | 2:10 PM
Share

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी स्थापन केलेली धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल आज देशभरातील सर्वात प्रतिष्ठेची शिक्षण संस्था मानली जाते. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये असलेल्या या शाळेचे नाव फक्त भारतातच नव्हे, तर जगभरातील उत्कृष्ट शाळांच्या यादीत घेतले जाते. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी २००३ मध्ये या शाळेची स्थापन केली होती. त्यानंतर या शाळेने अल्पावधीतच शिक्षणाच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते मोठ्या उद्योगपतींची मुले या ठिकाणी शिकत असल्याने या शाळेबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते.

तीन प्रमुख स्तरावर शिक्षण

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी प्रयोगशाळा मानली जाते. या शाळेत केवळ उच्च दर्जाचे शिक्षणच नाही, तर जागतिक दर्जाच्या सुविधाही मिळतात. या शाळेत तीन प्रमुख स्तरावर शिक्षण दिले जाते.

  • प्रारंभिक शिक्षण: मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी खेळ आणि कला आधारित शिक्षण.
  • माध्यमिक शिक्षण (ICSE आणि IGCSE): १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचे पर्याय.
  • उच्च माध्यमिक (IB Diploma): ११ वी आणि १२ वी साठी जगप्रसिद्ध ‘इंटरनॅशनल बॅकलॉरिएट’ प्रोग्राम, जो विद्यार्थ्यांना जागतिक विद्यापीठांसाठी तयार करतो.

या शाळेत प्रवेश कसा मिळतो?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळवणे ही एक दीर्घ आणि स्पर्धात्मक प्रक्रिया आहे. या शाळेत दरवर्षी मर्यादित जागांसाठी हजारो अर्ज येतात.

१. ऑनलाईन नोंदणी: प्रवेशासाठी शाळेच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. २. प्रवेश परीक्षा: मुलांची तर्कक्षमता आणि मूलभूत विषयांवरील पकड तपासण्यासाठी विशेष प्रवेश परीक्षा घेतली जाते. ३. मुलाखत फेरी: यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांशीही संवाद साधला जातो, ज्यामध्ये कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पाल्याच्या प्रगतीतील पालकांचा सहभाग तपासला जातो. यानंतर मग प्रवेश निश्चित केला जातो.

शाळेची वार्षिक फी किती?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक सोयी-सुविधा दिल्या जाता. या शाळेचा आंतरराष्ट्रीय दर्जा पाहता येथील फी सामान्य शाळांच्या तुलनेत जास्त आहे. यात शैक्षणिक साहित्य, गणवेश, वाहतूक आणि अद्ययावत प्रयोगशाळांच्या खर्चाचा समावेश असतो.

  • LKG ते ७ वी: सुमारे ₹१,७०,०००
  • ८ वी ते १० वी: सुमारे ₹५,९०,०००
  • ११ वी ते १२ वी (IB): सुमारे ₹९,६५,००० पेक्षा जास्त.

दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीसाठी शाळा प्रसिद्ध

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा परिसर सुमारे १,३०,००० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेला आहे. त्यात अद्ययावत क्लासरूम्स आहेत. या ठिकाणी पूर्णतः वातानुकूलित वर्गखोल्या आणि डिजिटल लर्निंग बोर्ड्स लावण्यात आले आहेत. तसेच या शाळेत मोठे ग्रंथालय असून ४०,००० हून अधिक पुस्तके यात आहेत. तसेच क्रीडा आणि कला यासाठी टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉलसाठी विस्तीर्ण मैदान, योगा सेंटर आणि ४५० आसनी अत्याधुनिक सभागृह आहे. या ठिकाणी केवळ श्रीमंतांची मुलेच नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. दर्जेदार शिक्षण आणि शिस्त हीच या शाळेची खरी ओळख आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....