Explainer : 5 मास्टरमाईंड अन् नीट पेपर लीकचे महाकांड, कशी आखली योजना? वाचा पेपरफुटीची A टू Z कहाणी!
NEET Paper Leak 2026: नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणातील पाच प्रमुख सूत्रधारांची ओळख पटली असून, या संपूर्ण नेटवर्कमध्ये नाशिकचा शुभम खैरनार हा अंदाजपत्रांचा मुख्य स्रोत असल्याचे मानले जात आहे. आता त्याने पेपर कसे लिक केले जाणून घ्या A टू Z कहाणी..

नीट पेपर लीक २०२६ चा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या अशा पाच पात्रांची माहिती समोर आली आहे, जे डॉक्टर बनण्याचा आणि बनवण्याचा खेळ खेळत होते. अहवालानुसार, एकाच कुटुंबातील हे पाच चेहरे गेल्या दोन वर्षांपासून नीट पेपर लीक प्रकरणात सामील होते. विशेष म्हणजे या कुटुंबात आधीच काही डॉक्टर आहेत. आता सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास करत आहे की, हे डॉक्टर्स देखील बोगस पद्धतीने तर बनले नाहीत ना? नीट पेपर लीकचे प्रकरण उघडकीस कसे आले? function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; ...
