AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सोप्या टिप्स फॉलो करून Digital Marketing मध्ये करा करिअर, लाखोंचा मिळेल पगार

ज्यांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे माहित नसेल तर जाणून घ्या. इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत, ज्यांचे अनुसरण करून तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता.

या सोप्या टिप्स फॉलो करून Digital Marketing मध्ये करा करिअर, लाखोंचा मिळेल पगार
Digitall Marketing SEOImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 22, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई: आजचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जगातील निम्म्याहून अधिक गोष्टी आज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा तऱ्हेने आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करणे हा अतिशय फायदेशीर पर्याय आहे. ज्यांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे माहित नसेल तर जाणून घ्या. इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत, ज्यांचे अनुसरण करून तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता.

सर्वप्रथम या क्षेत्रातील स्कोपबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळात या क्षेत्रात सर्वाधिक स्कोप आहे. आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे आपलं उत्पादन सहज लोकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळेच मोठमोठ्या कंपन्या आज चांगल्या पगारावर डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असलेल्या लोकांना कामावर घेतायत.

या क्षेत्रातील सोशल नेटवर्किंग साइट्सवरही मार्केटिंग तंत्राचा वापर केला जातो. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर दिसणाऱ्या जाहिराती हा त्याचाच एक भाग आहे.

ईमेल मार्केटिंग देखील याचाच एक भाग आहे. ईमेल मार्केटिंग ईमेल पाठवून लोकांना टार्गेट केले जाते यानंतर लोकांच्या प्रतिसादावर लक्ष दिले जाते.

यात आणखी एक गोष्ट आहे, ज्याला आपण ग्रोथ हॅकिंग म्हणतो. यामध्ये कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी फायनान्सशी संबंधित संकल्पना, कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि इतर अनेक गोष्टींच्या टिप्स दिल्या जातात.

याव्यतिरिक्त एक गोष्ट आहे, इनबाउंड मार्केटिंग. यामध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.

डिजिटल मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ). या माध्यमातून वेबपेजवर गुगल आणि याहू सारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून पेज व्ह्यू वाढवला जातो.

ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते बारावी किंवा पदवीनंतर हा कोर्स करू शकतात. हा कोर्स करून तुम्ही कंटेंट मार्केटर, कॉपी रायटर, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमाइझर वगैरे बनू शकता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.