दहावीनंतर शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी?
दहावीपर्यंत प्रत्येकाला जवळजवळ सारखेच विषय असतात. मूलभूत ज्ञानासाठी हे विषय वाचणे आवश्यक असतात, त्यामुळे हे विषय सारखे असतात. पण मग अकरावीत गेलं की विद्यार्थ्यांची धांदल उडते. इथे त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवड करायची असते.

मुंबई: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना शाखा निवडण्यात अडचणी येतात. कॉमर्सचा अभ्यास करायचा, आर्ट्स घ्यायचं की सायन्स निवडायचं? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच येतात. अनेकदा चुकीची स्ट्रीम निवडल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. या बातमीत तुम्हाला काही करिअर टिप्स मिळतील.
दहावीपर्यंत प्रत्येकाला जवळजवळ सारखेच विषय असतात. मूलभूत ज्ञानासाठी हे विषय वाचणे आवश्यक असतात, त्यामुळे हे विषय सारखे असतात. पण मग अकरावीत गेलं की विद्यार्थ्यांची धांदल उडते. इथे त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवड करायची असते.
विद्यार्थ्यांनी प्रथम अभ्यासक्रम निवडण्यासाठी करिअरच्या पर्यायाकडे लक्ष द्यावे. आपण जे क्षेत्र निवडणार आहात त्या क्षेत्रात करिअर ग्रोथ आहे का, मार्केटमध्ये त्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत की नाही हे लक्षात ठेवा. त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन नक्कीच घ्या.
अनेकदा विद्यार्थी आपली क्षमता समजून घेण्यास विसरतात. मित्र कोणता विषय निवडतो किंवा कुटुंबातील सदस्य सांगतात तोच विषय ते निवडतात. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची क्षमता समजून घ्या. हे जर तुम्हाला समजत नसेल तर बोर्डाच्या निकालात ज्या विषयात सर्वाधिक गुण आले आहेत तो विषय निवडा.
अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तम करिअर निवडण्यासाठी जवळच्या शिक्षकाची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांना तुमची क्षमता माहित आहे.
दहावीनंतर विद्यार्थ्यांना ही शाखा निवडण्यापूर्वी कौटुंबिक बजेटचीही काळजी घ्यावी लागते. आपण करणार असलेल्या कोर्ससाठी आपले पालक फी भरण्यास सक्षम आहेत की नाही हे शोधा. यासाठी आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोला.
