AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICSE, ISC Board Exams 2021: सीआयएससीई बोर्डाकडून दहावी बारावीच्या पहिल्या सत्राचं वेळापत्रक जाहीर, नोव्हेंबरपासून परीक्षा सुरु

कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

ICSE, ISC Board Exams 2021: सीआयएससीई बोर्डाकडून दहावी बारावीच्या पहिल्या सत्राचं वेळापत्रक जाहीर, नोव्हेंबरपासून परीक्षा सुरु
आयसीएसई
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 11:43 AM
Share

ICSE, ISC Board Exams 2021 नवी दिल्ली: कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमेस्टर एकची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीची परीक्षा 6 डिसेंबरला संपले तर बारावीची परीक्षा 16 डिसेंबरला संपणार आहे.

दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. बारावीची परीक्षा दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 1.5 तास असेल. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली आहेत.

CISCE वेळापत्रक या लिंकवरुन डाउनलोड करा

विद्यार्थी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

ICSE परीक्षेचे वेळापत्रक

ISC परीक्षेचे वेळापत्रक

ICSE, ISC बोर्ड परीक्षा 2021 वेळापत्रक डाउनलोड कसं करायचं?

स्टेप 1: सर्वप्रथम cisce.org च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल. स्टेप 4: आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल. स्टेप 5: आता तपासा आणि डाउनलोड करा

यूजीसी नेट परीक्षा अर्ज दुरुस्ती सुविधा सुरु

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2021 साठी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील अर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. एनटीए यूजीसी नेट परीक्षेच्या वेबसाईटवर अर्जात सुधरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा 7 सप्टेंबर 2021 रोजी सुरु करण्यात आली असून 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु राहील. जे उमेदवार अर्जामध्ये बदल करू इच्छितात ते UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट देऊन दुरुस्ती करू शकतात.

अर्ज सुधारणा सुविधा सशुल्क

अर्जात सुधारणा करण्याची सुविधा 12 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल. विहित मुदत संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत एनटीएकडून कडून सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही. अर्जामध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय किंवा पेटीएम वॉलेटद्वारे ऑनलाइन दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक आहे.अर्जात सुधारणा करण्याची सुविधा केवळ त्या उमेदवारांना उपलब्ध आहे ज्यांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक शुल्कासह अर्ज यशस्वीरीत्या सादर केला आहे. एनटीएने ही केवळ एक वेळची सुविधा दिली असल्याने, उमेदवारांनी सुधारणा करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

NET Exam 2021: एनटीएकडून नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवं वेळापत्रक जाहीर

UGC NET 2021 Exam: JRF च्या वयोमर्यादेसंदर्भात मोठा निर्णय, NTA कडून नोटिफिकेशन जारी

ICSE, ISC Board Exams 2021 CISCE released Semester 1 time table at cisce.org check details here

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.