IIT Mumbai : आयआयटी मुंबई क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींगमध्ये अव्वल, पाहा कुठला रॅंक मिळाला
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग जागतिक विद्यापीठाचे रॅंकींगचे वार्षिक प्रकाशन आहे. ज्यात दरवर्षी जगातील प्रमुख विद्यापीठे आणि संस्थांची लिस्ट जारी केली आहे.

नवी दिल्ली : आयआयटीमधून इंजिनिअरींग ( IIT ) करण्यासाठी विद्यार्थ्यांची दरवर्षी चढाओढ असते. हे भारतातील इंजिनिअरींगचे शिक्षण देणारे सर्वात प्रतिष्ठीत संस्थान आहे. या संस्थांमधून लाखो कुशल आणि हुशार इंजिनियर ( iit engineer ) दरवर्षी बाहेर पडतात. येथील शिक्षण पूर्ण होतात मोठमोठ्या कंपन्यांची दारे उघडी होतात. गुगल, ( Google ) मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जॉबची ऑफर चालत येते. देशातील पहिल्या आयआयटीची स्थापना साल 1951 मध्ये खडगपूर ( IIT Kharagpur ) येथे झाली होती. आता मुंबई आयआयटीची जागतिक युनिव्हर्सिटीत निवड झाली आहे.
आयआयटीमधून इंजिनिअरींग करण्यासाठी विद्यार्थ्यांची दरवर्षी चढाओढ असते. आता आयआयटी मुंबईला क्वाक्वेरेली सायमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींगच्या नव्या आवृत्तीत जगातील 150 प्रमुख युनिव्हर्सिटीत निवड करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर आयआयटी मुंबईला 149 वे स्थान मिळाले आहे. यंदाच्या जागतिक पातळीवर 23 पॉईंटने पवई येथील आयआयटी मुंबईची झेप वाढली आहे. आयआयटी मुंबईने ही माहीती दिली आहे. आयआयटी दिल्लीचा क्रमांक 197 तर भारतीय विज्ञान संस्थान ( आयआयएससी ) बंगलोरला 225 वी रॅंक मिळाली होती.
क्यूएसचे संस्थापक आणि सीईओ नुंजियो क्वाक्वेरेली यांनी आयआयटी मुंबईच्या आतापर्यंतच्या चांगल्या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या रॅंकींग करीता 2,900 तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड केली आहे. या यादी देशातील 45 संस्थांची निवड केली होती.
आयआयटी मुंबईला पहिले स्थान
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींगमध्ये आयआयटी मुंबईला देशातील पहिले स्थान मिळाले आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईला 177 वा रॅंक आला होता. यंदा आयआयटी मुंबईचा क्रमांक 149 वा आला असल्याचे संस्थेने म्हटले आहे. आयआयटी मुंबईला शंभरपैकी एकूण 51.7 गुण मिळाले आहेत. आपल्या भागीदारीनंतर यंदा प्रथमच आयआयटी मुंबईला हे 150 प्रमुख संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. संस्थेच्या साल 2023 च्या कामगिरीत यंदा वाढ झाली आहे.
45 भारतीय संस्थांना स्थान
यंदा पहिल्यांदाच क्यूएस वर्ल्ड युनिव्हसिर्टी रॅंकींगमध्ये 45 भारतीय संस्थांना स्थान मिळाले आहे. क्यूएस प्रमुखांनी सांगितले की यंदाच्या रॅंकींगमध्ये एकूण 2900 संस्थांना रेटींग मिळाली असून रॅंकींगमध्ये 45 जागतिक युनिव्हर्सिटींचा समावेश आहे. या यादीतील संस्थांमध्ये गेल्या नऊ वर्षांत 297 टक्के वाढ झाली आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग जागतिक विद्यापीठाचे रॅंकींगचे वार्षिक प्रकाशन आहे. ज्यात दरवर्षी जगातील प्रमुख विद्यापीठे आणि संस्थांची लिस्ट जारी केली आहे. यापूर्वी भारतीय विज्ञान संस्थान ( आयआयएससी ) बंगळुरूला 2016 मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च अशी 147 वी रॅंक मिळाली होती.
