केंद्राची पीएम श्री योजना आहे तरी काय ? केंद्राची योजना राज्यात लागू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरीही देण्यात आली आहे.

केंद्राची पीएम श्री योजना आहे तरी काय ? केंद्राची योजना राज्यात लागू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 4:06 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री ( PM Shri school ) योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास पंधरा हजार शाळांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे म्हंटले होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र ( Maharashtra News ) राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरीही देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या योजनेत राज्यसरकारसह केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही सहभाग घेता येणार असून महाराष्ट्रात त्याबाबतचा निर्णय झाला असून आज पीएम श्री योजना राज्यात राबविण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय धोरण ठरविले होते. त्यानुसार पीम श्री योजना राबविली जाणार आहे. त्यामध्ये शाळांचे धोरण ठरविणारे आणि आदर्श असणारे शिक्षक यामध्ये इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

आदर्श आणि धोरण ठरविणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण याबरोबरच अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास यामध्ये समावेश असणार आहे. पुढील काळाची गरज ओळखून यामध्ये कौशल्य विकसित कसे करता येईल यावर भर दिला जाणार आहे.

पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शाळांना सक्षम केलं जाणार आहे. प्रयोगात्मक अध्ययन हा त्यातील महत्वाचा भाग असणार आहे. खेळाच्या माध्यमातून अभ्यास, संशोधन करून त्याचा अभ्यास, चर्चात्मक अभ्यास करण्यावरही भर दिला जाणार आहे.

याशिवाय प्रत्येक स्तरावर चाचणी कारणे आणि त्यानुसार ज्ञानात भर वाढविण्यासाठी विद्यार्थ्याची क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून घेणे. या बाबींचा महत्वाचा भाग या योजनेत असणार आहे.

या शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्यावर भर राहणार आहे. प्रयोगशाळांबरोबर डिजिटल वर्ग, वाचनालय, खेळ विभाग आणि कला शिक्षण असणार आहे. याशियाय दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या बाबींचा समावेश केला जाणार आहे.

शेतीच्या निगडीत असलेल्या बाबीही शिकवल्या जाणार आहे. पाणी, वीज यांच्याबाबतचा सखोल अभ्यासावर भर असणार आहे. नैसर्गिक जीवनमान हा विषय सुद्धा या योजनेत घेण्यात आला आहे. त्यामुळे शाळेय वातावरणात मोठा बदल राहील.

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना स्वतःहून अध्ययन करण्याची इच्छा होईल त्यासाठी प्रोत्साहन देण्यावर या योजनेचा अधिक भर असेल. यामध्ये शाळांच्या बांधकामापासून ते दर्जेदार शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.