इंजिनिअरिंग प्रवेशाशी निगडित JoSAA Counselling! जाणून घ्या महत्वाच्या तारखा
समुपदेशन प्रक्रियेबद्दल अधिक माहिती josaa.nic.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'जेईई ॲडव्हान्स्ड'चा निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रियेची नोंदणी आता सुरू झालीये.

संयुक्त जागा वाटप प्राधिकरण समुपदेशन 2022 (JoSAA Counselling 2022) ची नोंदणी व निवड प्रक्रिया आजपासून, 12 सप्टेंबरपासून सुरू झालीये. जेईई ॲडव्हान्स्ड 2022 परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार जोएसएए समुपदेशनासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IIT आणि NIT+ मध्ये प्रवेश घेण्यासाठी ही समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. समुपदेशन प्रक्रियेबद्दल अधिक माहिती josaa.nic.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ (JEE Advanced) चा निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रियेची नोंदणी (Registration Process) आता सुरू झालीये.
जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या आवडीच्या आयआयटी आणि NIT+ संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जोएसएए समुपदेशन 2022 अनेक फेऱ्यांमध्ये केले जाणार आहे.
समुपदेशनासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डच्या गुणांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज भासणार आहे. JoSAA समुपदेशनासाठी नोंदणी सकाळी 10 वाजता सुरू झालेली आहे.
समुपदेशनासाठी नोंदणीच्या आधारे आयआयटी आणि NIT+ संस्थांमधील प्रवेशासाठी मॉक सीट अलॉटमेंटचा निकाल 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
JoSAA जागा वाटपाचा निकाल अंतिम होणार नाही, अशी माहिती उमेदवारांना देण्यात आली आहे. यामुळे इतर उमेदवारांना त्यांच्या प्रवेशाबाबत कल्पना येईल.
JoSAA Counselling 2022 च्या महत्वाच्या तारखा
- उमेदवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नोंदणी करण्यास सुरवात करतील.
- उमेदवारांच्या निवडीवर आधारित मॉक सीट ॲलोकेशन-1 — 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता
- उमेदवारांच्या निवडीवर आधारित मॉक सीट ॲलोकेशन-2 — 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता
- जोसएए जागा वाटप 2022 फेरीचा निकाल 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता
उमेदवारांना सांगितले जाते की JoSAA समुपदेशन नोंदणी फक्त एकदाच केली जाऊ शकते. तेही पहिल्या फेरीच्या वेळी.
त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. त्यांना इतर कामे करता येतील शिवाय जागा वाटपाचा निकाल पाहता येईल.
जर एखाद्याला पहिल्या फेरीत जागा मिळाली नाही, तर ते नेहमीच त्यांच्या JoSAA जागा वाटपाच्या निकालाची पुढच्या फेरीसाठी वाट पाहू शकतात.
