AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ.उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ.उज्वला चक्रदेव यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे.

डॉ.उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
उज्वला चक्रदेव
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 2:44 PM
Share

मुंबई: नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

36 वर्ष अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव

डॉ.उज्वला चक्रदेव यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर 36 वर्षांचा अनुभव लाभला आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ 2 जूलै 2021 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.

पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडून स्थापना

एसएनडीटी महिला विद्यापीठ हे भारतातील तसेच दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षी डॉ.धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये स्त्री शिक्षणाच्या उदात्त कारणासाठी विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठातून पहिल्या पाच महिलांनी 1921 मध्ये पदवी प्राप्त केली. विद्यापीठाचे मुख्यालय चर्चगेट कॅम्पस, मुंबई येथे आहे आणि या विद्यापीठाचे इतर दोन कॅम्पस जुहू, मुंबई आणि कर्वे रोड, पुणे येथे आहेत.

एनआयआरएफ रँगिंक जाहीर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 साठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्यावर्षी प्रमाणं यंदा देखील रँकिंग ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासनं पहिलं स्थान पटकावलं आहे. यावर्षी टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ही कॅटेगरी देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान एकूण 10 कॅटेगरीमधील रँकिंग जाहीर केलं आहे. ओवरऑल, विद्यापीठ, व्यवस्थापन, कॉलेज, फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एचआरआआए आणि कायदा या संदर्भातील संस्थांचं रँकिंग जारी केल आहे. एनआयआरएफ रँकिंग शैक्षणिक संस्थांना टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस, ग्रॅज्युएशन आऊटकम, आऊटरिच अँड इँक्ल्यूसिवीट, परसेप्शन याआधारे दिलं जातं.

इतर बातम्या:

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?

राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.