राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?

आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त झाली होती.

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?
संसद

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यसभा सदस्य निवडीसाठी निवडणूक आयोगानं वेळापत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त झाली होती.


4 ऑक्टोबरला मतदान आणि निकालही

पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल. अर्ज मागे घेण्याची तारीख 27 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर, मतदान आणि निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगानं ही संपूर्ण प्रक्रिया 6 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असं देखील कळवलं आहे. याशिवाय बिहारमधील विधानपरिषद निवडणूक देखील याचवेळी पार पडणार आहे.

राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त

काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. तर, राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना संधी देणार का पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Trending Video : रस्त्याच्या मधोमध गाडी खराब झाल्यानं वधू लागली रडायला, मग पोलिसाने काय केलं ते तुम्हीच पाहा

Election Commission of India declared schedule for Rajya Sabha by-polls for six seats including seat in Maharashtra of Rajeev Satav on oct 4

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI