Maharashtra Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनं शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांसह प्रशासनाची कसोटी

कोरोना विषाणू संसर्गामुळं लांबणीवर पडलेल्या पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा आज आयोजित होत आहेत. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अनेकदा लांबणीवर टाकण्यात आली होती. मुंबई वगळता राज्यभर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Maharashtra Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनं शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांसह प्रशासनाची कसोटी
शिष्यवृत्ती परीक्षा

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं लांबणीवर पडलेल्या पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा आज आयोजित होत आहेत. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अनेकदा लांबणीवर टाकण्यात आली होती. मुंबई वगळता राज्यभर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यावर ठाम होती, अखेर आज परीक्षा पार पडत आहे. 6 लाख विद्यार्थ्यांसह प्रशासनाची देखील परीक्षा आज पार पडणार आहे. कारण, कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मोठ्या स्वरुपातील पहिली शालेय परीक्षा आहे. परीक्षा देण्यासाठी शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचं वातावरण

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आजपासून सुरू होत आहे ..गेल्या दीड वर्षात दोन वेळेस रद्द झालेल्या या परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे मुलांनी प्रत्येक्ष शाळेत येऊन परीक्षा देण्याची मुभा त्यांना दीड वर्षानंतर पहिल्यांदाच या परीक्षेच्या निमित्ताने मिळत असल्याने ,परीक्षा केंद्रांवर काळजी घेतली जाते आहे.


पुण्यात 52 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

पुण्यात 449 परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे. पाचवी आणि आठवीची परीक्षा होत आहे. 52 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पुण्यातले विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ऑनलाईन लेक्चर्सद्वारे परीक्षेची तयारी देतोय. विद्यार्थी मित्रांना भेटून आनंद होतोय, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना नियमांचं पालन करण्यात आलंय. पालकांना परीक्षा केंद्रावर थांबण्यास मनाई करण्यात आलीय. दोन सत्रांमध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

औरंगाबादमध्येही परीक्षेची जय्यत तयारी

औरंगाबादेत आज 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्तीची परीक्षा होत आहे. शहर आणि जिल्ह्यात तब्बल 23 हजर 511 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पाचवीचे तब्बल 14 हजार 339 तर 8 वीचे 9 हजार 172 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील 254 केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात होत आहे.

6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार

राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.

इतर बातम्या:

Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

CBSE 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता, निकाल कुठे पाहायचा?

ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर

Maharashtra Scholarship exam conducted by Maharashtra State Examination Council all over state today excluding mumbai

Published On - 11:07 am, Thu, 12 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI