दहावी परीक्षांचं काय होणार, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्राचं लक्ष, बारावी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी

दहावी परीक्षांचं काय होणार, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्राचं लक्ष, बारावी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी
संग्रहित छायाचित्र.

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. SSC exam Bombay High Court

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 03, 2021 | 10:29 AM

मुंबई: पुण्यातील प्रा.धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात दहावी परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा अशी जनहित याचिका दाखल केली होती. कुलकर्णी यांच्या याचिकेवर आज सुनावणी होईल. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टातही बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं सोमवारी झालेल्या सुनावणीत निर्णय जाहीर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतली होती. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात बारावी आणि दहावी परीक्षांच्या सुनावणी दरम्यान काय होते ते पाहावं लागणार आहे. (Maharashtra SSC exam hearing in Bombay High Court and class 12th exam hearing in Supreme Court today)

केंद्र सरकारकडून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द

सुप्रीम कोर्टाकडून मागून घेतलेल्या वेळेमध्ये केंद्र सरकारनं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात या निर्णयाची माहिती दिली जाईल.

धनंजय कुलकर्णी यांना नवा अहवाल सादर करण्याचे आदेश

दहावीच्या परीक्षेसंदर्भातील राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत. दोन वेगवेगळ्या हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं निर्णय देण्यास हायकोर्टानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत नकार दिला. एकच याचिका फक्त परीक्षा घ्या या बाजूची, जी धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती. दहावीतील एक विद्यार्थी आणि दोन पालकांचा परीक्षेस नकार देणारी याचिका दाखल झाली होती. सरकारने दहावी परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या निकषांना जोडून न्यायालयात अहवाल सादर करा, असं याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींना कोर्टानं सांगितलं आहे.

कुलकर्णींच्या याचिकेवर इंटर्व्हेन्शन याचिका

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी हाय कोर्टात कुलकर्णी यांची याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारचा निर्णय रद्द करु नये. जगभर कोरोनामुळे परीक्षा रद्द होत आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर प्रमोट केल जातं आहे, असं अनुभा श्रीवास्तव यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.

केंद्राच्या निर्णयाचा परिणाम?

केंद्र सरकारनं सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्रानं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर त्याचा निश्चित परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टातील आजची सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकार बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकते.

संबंधित बातम्या:

सीबीएसईप्रमाणं विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या, प्रियांका गांधी यांचं बारावी संदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन

Maharashtra HSC exam : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार

(Maharashtra SSC exam hearing in Bombay High Court and class 12th exam hearing in Supreme Court today)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें