Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC पूर्व परीक्षेसाठी लगेच अर्ज करा, आज शेवटची तारीख

UPSC Civil Services Exam 2025: तुम्ही अद्याप यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी अर्ज केला नसेल तर ते लवकर करा, कारण आज शेवटची तारीख आहे. उमेदवार यूपीएससी upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा upsconline.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

UPSC पूर्व परीक्षेसाठी लगेच अर्ज करा, आज शेवटची तारीख
UPSCImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 18, 2025 | 12:30 PM

UPSC Civil Services Exam 2025: यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर यूपीएससी upsc.gov.in किंवा upsconline.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

आयोगाने यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी निश्चित केली होती, जी नंतर 18 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. यंदा 979 पदांवर अधिकारी भरतीसाठी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येणार आहे.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2025 आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. याशिवाय अर्ज खिडकी बंद झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी २०२५ पर्यंत 7 दिवसांची अर्ज दुरुस्ती विंडो आता 7 दिवस खुली राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच ओटीआर प्रोफाइल तयार करावे लागेल. हे ओटीआर प्रोफाइल आजीवन वैध आहे. ज्या उमेदवारांनी आधीच आपले प्रोफाइल तयार केले आहे ते थेट अर्ज भरू शकतात. यूपीएससी कॅलेंडरनुसार ही परीक्षा 25 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात केली जाईल.

‘या’ सेवांसाठी अधिकाऱ्यांची भरती केली जाणार

  • भारतीय प्रशासकीय सेवा
  • भारतीय परराष्ट्र सेवा आयएफएस
  • भारतीय पोलीस सेवा
  • भारतीय लेखा परीक्षण व लेखा सेवा, गट ‘अ’
  • भारतीय नागरी लेखा सेवा, गट ‘अ’
  • इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, गट ‘अ’
  • भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट ‘अ’
  • इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस, गट ‘अ’
  • भारतीय माहिती सेवा, गट ‘अ’
  • भारतीय टपाल सेवा, गट ‘अ’
  • भारतीय टपाल व दूरसंचार खाते व वित्त सेवा, गट ‘अ’
  • भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (वाहतूक), गट ‘अ’
  • भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (कार्मिक), गट ‘अ’
  • भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा), गट ‘अ’
  • भारतीय रेल्वे सुरक्षा बल सेवा, गट ‘अ’
  • भारतीय महसूल सेवा (सीमा शुल्क व अप्रत्यक्ष कर) गट ‘अ’
  • भारतीय महसूल सेवा (प्राप्तिकर) गट ‘अ’
  • इंडियन ट्रेड सर्व्हिस, ग्रुप ‘ए’ (ग्रेड ३)
  • सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा, गट ‘ब’ (सेक्शन ऑफिसर ग्रेड)
  • दिल्ली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली नागरी सेवा (दानिक्स), गट ‘ब’
  • दिल्ली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली पोलिस
  • सेवा (डीएएनआयपीएस), गट ‘ब’
  • पाँडिचेरी नागरी सेवा (पांडिक्स), गट ‘ब’
  • पाँडिचेरी पोलिस सेवा (पोंडिप्स), गट ‘ब’

पात्रता निकष काय आहेत?

शैक्षणिक पात्रता : या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवारही त्यासाठी अर्ज करू शकतात, मात्र नंतर त्यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्ष आणि कमाल 32 वर्ष असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क किती आहे?

यूपीएससी सीएसई 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर महिला / एससी / एसटी / बेंचमार्क अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

किती वेळेस परीक्षा देता येणार?

अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी जास्तीत जास्त सहा वेळा प्रयत्न करू शकतात, तर ओबीसी उमेदवार नऊ वेळा परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबर एससी आणि एसटी उमेदवार किती वेळा परीक्षा देऊ शकतात यावर कोणतीही मर्यादा नाही.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.