तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 291 उमदेवारांची यादी जाहीर करून बाजी मारली आहे. (76 tmc leaders meet bjp leader mukul roy to join bjp)

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 291 उमदेवारांची यादी जाहीर करून बाजी मारली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी अनेक नेत्यांचे तिकीट कापल्याने हे नेते नाराज झाले आहेत. नाराज असलेल्या टीएमसीच्या या 76 नेत्यांनी थेट भाजप नेते मुकुल रॉय यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं असून टीएमसीमध्ये आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (76 tmc leaders meet bjp leader mukul roy to join bjp)

ममता बॅनर्जी यांनी सोशल इंजीनियरींगचा समन्वय राखत उमदेवारांची यादी जाहीर केली. महिला आणि तरुणांना निवडणुकीत अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी आणि एमआयएमचा प्रभाव मोडून काढण्यासाठी मुस्लिम उमदेवारांनाही मोठ्या प्रमाणावर तिकीट दिलं आहे. भाजपला पराभूत करत बंगालचा गड कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी यांन कसरत सुरू केलेली असताना तिकीट न मिळाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाराजांनी आता थेट भाजप नेते मुकुल रॉय यांची भेट घेऊन भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या 76 नाराजांमध्ये माजी आमदारही आहेत. तसेच ज्या 28 आमदारांचे तिकीट कापण्यात आले ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या शिवाय विद्यमान आमदार दिनेश बजाज आणि गीता बख्शी हे सुद्धा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या नाराजांनी भेट घेतली असून त्यांना रॉय यांनी काय आश्वासन दिलं ते अद्याप समजू शकलेले नाही. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच मुकुल रॉय पुढचा निर्णय घेणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते जर भाजपमध्ये सामील झाल्यास टीएमसीसाठी तो मोठा धक्का असणार आहे. तसेच या नाराजांच्या मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी टीएमसीला मोठा संघर्ष करावा लागेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

सोशल इंजीनियरिंग

ममता बॅनर्जी यांनी केवळ मुस्लिमांनाच उमदेवारी दिली नाही. तर सोशल इंजीनियरिंगवरही भर दिला आहे. त्यांनी 50 महिलांना, 42 मुस्लिमांना, 79 अनुसूचित जाती आणि 17 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकिट दिलं आहे.

नंदीग्राममधून लढणार

ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे सहकारी शुभेंद्रू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. नंदीग्राम हा शुभेंद्रू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एका दशकापासून नंदीग्रामची सीट टीएमसीकडे आहे. परंतु शुभेंद्रू यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राममधील 40 ते 45 जागांवर शुभेंद्रू यांचा प्रभाव आहे. त्यांचा हा प्रभाव कमी करण्यासाठी आणि टीएमसीचे बालेकिल्ले मजबूत करण्यासाठीच ममतादीदींनी नंदीग्रामची निवड केल्याचं सूत्रांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आता सोवानदेव चटर्जी यांना तिकीट दिलं जाणार आहे. (76 tmc leaders meet bjp leader mukul roy to join bjp)

 

संबंधित बातम्या:

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

(76 tmc leaders meet bjp leader mukul roy to join bjp)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI