Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab New CM 2022: भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, केजरीवालांचा 13 मार्चला अमृतसरमध्ये रोड शो

पंजाब विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर आता आम आदमी पार्टीने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे खासदार भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Punjab New CM 2022: भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, केजरीवालांचा 13 मार्चला अमृतसरमध्ये रोड शो
भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 6:11 PM

चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर आता आम आदमी पार्टीने  (AAP) सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी 13 मार्च रोजी भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी आज दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. आपने पंजाबमधील 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले. तर माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही पराभूत व्हावं लागलं आहे.

शहीद भगत सिंग यांचं गाव असलेल्या नवांशहर जिल्ह्यातील खटकर कला येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. लोकांनी अहंकारी लोकांना पराभूत केलं आहे. त्यांनी सामान्य लोकांना विजयी केलं आहे, असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे. मान यांनी धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे दलवीरसिंग गोल्डी यांचा 58 हजार मतांनी पराभव केला.

मान यांनी केला चरणस्पर्श

भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचा चरणस्पर्श केला. पंजाबमध्ये आपचे केवळ 20 आमदार होते. मात्र, आपने चांगली कामगिरी केल्याने पंजाबच्या मतदारांनी आपला भरभरून मतदान केलं. आपचे 92 आमदार पंजाबच्या लोकांनी निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ 18, अकाली दल आघाडीला चार, भाजप आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.

संबंधित बातम्या:

महापालिकेसह इतर निवडणुका अखेर लांबणीवर, ‘त्या’ अध्यादेशावर राज्यपालांची सही; ओबीसींना दिलासा

Maharashtra Budget 2022 : बजेटमधील चौथे सूत्र, दळवण सुविधांसाठी किती कोटींची तरतूद?

UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.