आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही उत्पल पर्रिकरांना ऑफर! अपक्ष लढल्यासही पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांचा दावा

उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी येत्या एक दोन दिवसात त्यांना भेटून आमंत्रणही देईन की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही उत्पल पर्रिकरांना ऑफर! अपक्ष लढल्यासही पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांचा दावा
जितेंद्र आव्हाड, उत्पल पर्रीकर
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:00 PM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार उडी घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आज गोवा दौऱ्यावर आहेत. अशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उत्पल पर्रिकरांच्या (Utpal Parrikar) उमेदवारीवर महत्वाचं वक्तव्य केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उत्पल पर्रिकर यांना आपमध्ये प्रवेशाची ऑफर दिलीय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ते अपक्ष लढल्यासही पाठिंबा देण्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.

‘भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत नाही’

भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे मला वाटत नाही. त्यांचा इथे एक पाया होता. ख्रिश्चनांनीही मनोहर पर्रिकर यांना स्वीकारले होते. पण आता ख्रिश्चन स्वीकारतील असा चेहरा भाजपकडे नाही. या मतांशिवाय सत्तेत येणं कठीण असते. मराठी मते शिवसेना कापणार. दोन्हीकडे जे कापकापीचे राजकारण त्यात कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही, असा अंदाजही आव्हाड यांनी व्यक्त केलाय.

उत्पल पर्रिकरांना ऑफर, भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

भाजपचा मला तुटलेला दुवा इथे दिसतोय की, ते पाया गमावत आहेत. जे काँगेसने वाढवले (बाबुश मोंसेरात) ते पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते भाजपचे काय होणार? पण जे पर्रीकर गोव्याच्या घराघरात दिसले. कुठेही चणे खात उभे राहायचे, फिश मार्केट मध्ये फिरायचे, स्कुटरवर फिरायचे, त्यांना गोवन आपला मानायचा. अचानक भाजपने फॉर्म्युला लावावा की नेत्याच्या मुलाला तिकीट देता येणार नाही, हे चुकीचे आहे. काम दाखवावे लागेल हे ठीक आहे. पण आपण भारतीय संस्कृतीत राहातो. पर्रीकर यांच्याविषयी त्यांच्या मतदार संघात असलेली सहानुभूती ती काहीही बोललात तरीही नाकारता येणार नाही. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी येत्या एक दोन दिवसात त्यांना भेटून आमंत्रणही देईन की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत.

‘गोव्यात अस्थिरता दिसतेय’

गोव्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आव्हाड म्हणाले की, गोव्यात मला अस्थिरता दिसतेय. गेल्या दोन महिन्यात उत्तर भारतात ख्रिश्चनांविरोधात जे वातावरण तयार करण्यात आले, खास करून आग्रा, दिल्ली तिथे चर्चच्या बाहेर सांताक्लॉज मुरदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. त्याला जाळणे अशा विचित्र घटनांनी फक्त गोव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील ख्रिश्चन अस्वस्थ झाले. साधारण अल्पित राहणारा असा समाज आहे. उत्तरेचे पडसाद गोव्यात उमटले. त्यामुळे मोठा बदल होऊही शकतो, अशी शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

‘समविचारी पक्षात आघाडी व्हायला हवी होती’

तसंच काँग्रेस सोबत आघाडीच्या मुद्द्यावर बोलताना ‘समविचारी पक्षात आघाडी व्हायला हवी होती, ती काँग्रेसने मनावर न घेतल्याने होऊ शकली नाही. आपण विचार करायला हवा. महाराष्ट्रात एकत्र आलो म्हणून भाजपला सत्तेपासून बाहेर ठेऊ शकलो. ती मानसिकता देशभरात असायला हवी, तरच भाजपला आपण लांब ठेवू शकू. काँग्रेस इथे भाजपला रस्ता मोकळा करत आहे. कुठल्याही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत सुरू असते, पण तुमच्या मनातच नसले तर ती बंद होते, असंही आव्हाड म्हणाले. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीबाबत चर्चा सुरु असल्याचंही ते म्हणाले.

इतर बातम्या :

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती? चित्रा वाघ यांचा सवाल

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.