पर्रिकरांच्या मुलाला तिकीट नाही देणार भाजपा? फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चा, ‘धाडसी’ निर्णय घेणार का उत्पल पर्रिकर?

त्यामुळे पणजीसाठी उत्पल पर्रिकर की बाबूश मॉन्सेरेट अशी चर्चा सुरु होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्याचा फैसला दिल्याचं चित्रं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे 'हार्ड डिसिजन' घेणार का? याची उत्सुकता आहे.

पर्रिकरांच्या मुलाला तिकीट नाही देणार भाजपा? फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चा, 'धाडसी' निर्णय घेणार का उत्पल पर्रिकर?
देवेंद्र फडणवीस, गोवा भाजप निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:52 AM

मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) होते त्यावेळेस गोव्याचे प्रभारी होते नितीन गडकरी. आता पर्रिकर नाहीत तर तिथले प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काम पहातायत. गोवा छोटं राज्य असलं तरीसुद्धा भाजपानं त्यासाठी आधी काय काय करुन सत्ता आणली तो इतिहास आहे. पण यावेळेस गोव्याची निवडणूक दोन कारणांमुळे महाराष्ट्रात चर्चेत आहे. पहिलं कारण म्हणजे फडणवीस आणि राऊत या दोघात रोज सुरु असलेले आरोप प्रत्यारोप आणि दुसरं कारण आहे ते मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रिकर. उत्पल पर्रिकरांनी (Utapal Parrikar) गोव्याची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. पण त्यासाठी भाजपा राजी नसल्याचं दिसतंय. त्यातच फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय त्यानंतर तर उत्पल पर्रिकरांना तिकीट मिळण्याची शक्यता धूसर होत चाललेली दिसतेय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातल्या घडलेल्या चुकीच्या निर्णयावर. पण त्यांना उत्पल पर्रिकरांबद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले, असंय की मनोहर भाईंनी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी इस्टॅबलिश करण्या करता भरपूर काम केलेलं आहे. पण केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं.

उत्पल पर्रिकरांची भूमिका काय? उत्पल पर्रिकर हे मनोहर पर्रिकरांचे पूत्र आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजी सीटवरुन त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळेस भाजपनं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी कुंकोळीकर यांना उमेदवारी दिली गेली. त्यात कुंकोळीकर काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरेट यांच्याकडून पराभूत झाले. नंतर हे बाबूश काही काँग्रेस आमदारांसह भाजपात दाखल झालेत. पणजी विधानसभा मतदारसंघ हा मनोहर पर्रिकरांचा पारंपारीक मतदारसंघ होता. पण बाबूश यांनी भाजपच्या बाजूनं सहानुभूती असतानाही निवडणूक जिंकली होती. आताही त्यांनीच पणजीच्या जागेवर दावा केलाय. पण दुसरीकडे उत्पल पर्रिकरांनीही पुन्हा दंड थोपटलेत. त्यामुळे पणजीसाठी उत्पल पर्रिकर की बाबूश मॉन्सेरेट अशी चर्चा सुरु होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्याचा फैसला दिल्याचं चित्रं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘हार्ड डिसिजन’ घेणार का? याची उत्सुकता आहे.

राऊतांचं धाडसाचं आवाहन उत्पल पर्रिकरांना गळाला लावण्याचे सर्व प्रयत्न शिवसेना करताना दिसेतय. राजकारणात टिकण्यासाठी जे एक धाडस असायला लागतं ते उत्पल पर्रिकर दाखवणार का हा सर्वस्वी त्यांना निर्णय घ्यायचाय असं राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालेत. गेल्या दोन तीन दिवसात ज्यावेळेसही राऊतांना हा प्रश्न विचारला गेलाय, त्या त्या वेळेस त्यांनी उत्पल पर्रिकरांना ‘धाडस’ दाखवण्याचं आवाहन केलंय.

हे सुद्धा वाचा:

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत पवार, राऊतांचं मोठं भाकित, चंद्रकांतदादा म्हणतात ‘मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार ते सांगा’!

गोवा भाजपला गळती सुरूच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांटेंचा राजीनामा, आतापर्यंत चार जणांनी सोडला पक्ष

सेनेला उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत दरवेळी डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, ते घालवतात- चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.