Goa Election: उत्पल पर्रिकरांना तिकीट नाहीच, 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर, पर्रिकरांचं तिकीट का कापलं?; फडणवीसांनी सांगितलं कारण

Goa Election: उत्पल पर्रिकरांना तिकीट नाहीच, 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर, पर्रिकरांचं तिकीट का कापलं?; फडणवीसांनी सांगितलं कारण
utpal parrikar, devendra fadnavis

भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 20, 2022 | 1:22 PM

पणजी: भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या 40 पैकी 34 उमदेवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी फडणवीस यांना उत्पल पर्रिकरांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यावर, पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आलं आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

goa bjp candidate list

goa bjp candidate list

काँग्रेसची विश्वासहार्यता संपली

यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलं. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात काँग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्यांना सत्ता केवळ यासाठी हवी (बोलत असताना माईक बंद झाला. फडणवीस म्हणाले भाई हमारी आवाज कोण बंद कर सकता है यार) केवळ लूटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवा आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासहार्यता संपली आहे, अशी टीका त्यांनी केली.

goa bjp candidate list

goa bjp candidate list

युती भावली नाही

यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवरही टीका केली. तृणमूल गोव्यात आली आहे. एमजीपीसोबत त्यांनी आघाडी केली आहे. टीएमसीने ज्या पद्धतीचं राजकारण केलं आहे. त्याला गोव्याने नाकारलं आहे. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवश्यावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने दाखवली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही. पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही सुटेबल पार्टी वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ. काही एमपीजीपी नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आणि काहींनी भाजपमध्ये पक्ष सोडला. ही युती लोकांना भावलेली नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

आम्ही ‘सोंगाड्या’ नक्कीच नाही, चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाहीत, संजय राऊतांना फडणवीस, चंद्रकांतदादांवर निशाणा

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें