AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांनी खाल्लं त्यांचं मटण अन् दाबलं आमचं बटण; गुलाबराव पाटील यांची चौफेर टोलेबाजी

लोक कलाकार आहे. हवामानाचा अंदाज घेतात..चार महिने आमच्या हातात आहेत. निवडणूक लढवायची आहे, तुम्ही आम्हाला ठरवणारे आहात. पाच जून आजची गर्दी पाहिल्यावर मी काही आवरणार नाही. हे प्रेम बाजारात मिळत नाही. मला आशीर्वाद मिळाले..आज कृतज्ञ झालो असेही जळगावातील सभेत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

लोकांनी खाल्लं त्यांचं मटण अन् दाबलं आमचं बटण; गुलाबराव पाटील यांची चौफेर टोलेबाजी
gulabrao patil Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 06, 2024 | 5:32 PM
Share

जळगावमध्ये भाजपाच्या दोन लोकसभा जागा आल्या आहेत. एक जळगावात स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. याचा विजय महोत्सव साजरा करण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजयाबद्दल जनतेचे आभार मानत जळगाव जिल्हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला होता बाले किल्ला आहे आणि बालेकिल्ला राहणार हे आपण या ठिकाणी दाखवल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नऊ जागा कशामुळे आल्या. त्यांना मुस्लिमांची मते मिळाली. दलितांना सांगितले की घटना बदणार आहे असं सांगून त्यांनी मते मिळविली. मुस्लिम आणि दलित सरकले तर मग तुमचे काय होईल ?..तेरा क्या होगा..संजय राऊत, तू काय बोलतो, त्याला तर सांगितल होतं..माझ्या मतदार संघात लढ..मग बघ कसा भगवा फडकवतो आणि तुला आडवा पडतो अशा शद्बात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यंदा महिलांनी सर्वाधिक मते दिली आहेत. आपल्याकडे 100 टक्के महिला आहेत. दोन्ही महिला खासदार, चार महिन्यानंतर आपली निवडणूक. होऊन होऊन किती कमी होतील ? लोकांनी खाल्लं त्यांचं मटण आणि दाबल आपल बटण….अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाषण करताच उपस्थितात एकच खसखस पिकली. देशात आणि राज्यात म्हणे आमची वाईट स्थिती आमची झाली आहे. आता मला सांगा..240 खासदार भाजपाचे आहेत..250 पक्के..त्यांच्याकडे एकाच पक्षाचे एवढे खासदार आहेत का ?..आणि जर त्यांचं झालच सरकार तर..मुंडकं काँग्रेसचं , कंबर चंद्राबाबूची आणि बोटं शरद पवार यांची अस कसं चालेल सरकार ? असेही ते म्हणाले.

गद्दार हा विषय आता संपला आहे. लोकांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय माहीत ..त्यांना मीच माहित आहे..तुमच्यासाठी एकनाथ शिंदे पण मीच आणि मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा मीच आहे. आमच्या काळात जेवढे बौद्ध विहार झाले ते काँग्रेसच्या काळात नाही झाले. त्यांनी मुस्लिमांना भीती दाखवली. दलितांना भीती दाखविली. काँग्रेसने घटना 80 वेळा बदलली आहे. आम्हाला म्हटलं..तुमचे काय होईल, तर  आजपर्यंत जी सेवा केली तशीच सेवा करणार. स्मिता वाघ यांनी दिल्लीत जळगावचा आवाज घुमवा अशी विनंती करतो असेही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी भाषणात म्हटले.

देवेंद्र फडणवीस राजीनामा

शेवटी हा त्यांचा पक्षांर्गत विषय आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. साहजिक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जर जागा कमी आल्याअसतील, त्यामुळे त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल. शेवटी केंद्रीय नेतृत्व त्यावर निर्णय घेईल. शेवटी देवेंद्रजी यांची ही चूक आहे असे म्हणता येणार नाही. राजस्थान असेल किंवा इतर राज्यांमध्ये कमी जागा आल्या तर मग त्या ठिकाणी सर्वांची चूक झाली असं म्हणावं लागेल. काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत मात्र त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही. आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना साद घालतो आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांच्या मागणीवर कमिटी निर्णय घेईल

भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे राजापूर मतदार संघातून भाजपाने निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की बघूया आता केवळ चर्चा आहे. चर्चांमध्ये सर्व निर्णय होत नाही. मागणी करणं हा गुन्हा नाही, शेवटी कमिटी असते. कमिटी निर्णय घेत असते, आणि आणखी निवडणुकीला चार महिने बाकी आहेत. अजून बैठक झालेली नाही. आता आम्ही फक्त सध्या दिल्लीतील शपथविधीची वाट बघतो आहोत असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.