AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Final Result 2024: नवनीत राणा, राहुल शेवाळे यांची हवा गूल, ठाकरे गटाने मारली बाजी

Maharashtra Lok Sabha Election Final Result 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपाचा 400 पारचा नारा हवेतच विरल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांना जबरदस्त फटका बसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाने महायुतीची हवा काढून टाकली. इतकंच काय तर दिग्गज उमेदवारांनाही पराभवाचं पाणी पाजलं.

Election Final Result 2024: नवनीत राणा, राहुल शेवाळे यांची हवा गूल, ठाकरे गटाने मारली बाजी
| Updated on: Jun 04, 2024 | 7:56 PM
Share

लोकसभा निवडणुकीत कौल भाजपाप्रणित सरकारच्या बाजूने लागला आहे. असं असलं तरी भाजपाला आता मित्रपक्षांच्या आधारावर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या निर्णय क्षमतेवर फरक पडेल हे आता स्पष्ट आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात भाजपा आणि मित्र पक्षांची पुरती दैना झाली आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतरही भाजपा आणि मित्रपक्षांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने नव्या चिन्हावर निवडणूक लढवूनही प्रस्थापितांना दणका दिला आहे. मुंबईत ठाकरे गटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुल शेवाळे, यामिनी जाधव यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर नवनीत राणा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही अपयश पदरी पडलं आहे. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणावर येत्या काही दिवसात याचा प्रभाव पडेल यात शंका नाही.

मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या लढत होती. ही लढत चुरशीची वाटत होती. पण यात अनिल देसाईंनी एकहाती बाजी मारली आहे. अनिल देसाई यानी राहुल शेवाळे यांचा 53,384 मतांनी पराभव केला. तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. रविंद्र वायकर यांचा काठावर विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा 48 मतांनी पराभूत केलं. मुंबईत या दोन ठिकाणी ठाकरेंची मशाल पेटली. तर एका जागेवर निसटता पराभव झाला.

अमरावतीतून भाजपाकडून नवनीत राणा आणि काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांच्यात लढत होती. मात्र नवनीत राणा यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढवून नवनीत राणा यांनी विजयाची चव चाखली होती. मात्र यावेळी भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवून काही एक फायदा झाला नाही. बळवंत वानखेडे 14214 मतांनी विजय मिळवला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.