ठाकरेंना कुणाचा पाठिंबा, भाजपपासून कुणाची फारकत? निवडणुकीची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी
शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या जागा जिंकून आल्या त्यावरून भाजपने ठाकरे गटावर टीका करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे गटाला मुस्लिमांची मते मिळाल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजपच्या या आरोपात किती सत्यता आहे याचा घेतलेला हा आढावा.

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोलने जे अंदाज व्यक्त केले होते ते फोल ठरवत प्रत्यक्षातील निकाल वेगळेच लागले. महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या जागा जिंकून आल्या त्यावरून भाजपने ठाकरे गटावर टीका करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे गटाला मुस्लिमांची मते मिळाल्याचा आरोप भाजप करत आहे. ज्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नेहमी निवडणुका लढविल्या. मात्र, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून मुस्लिमांचा पाठींबा घेतल्याची टीकाही आता भाजपकडून होत आहे. भाजपच्या या आरोपात किती सत्यता आहे याचा घेतलेला हा आढावा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपाने नवा...
