Assembly Election 2022 : पंजाबमध्ये निवडणुकांची घोषणा, मात्र कोरोनाची स्थिती चिंताजनक! ऑक्सिजनच्या मागणीत अचानक वाढ

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशावेळी पंजाबमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. कारण पंजाबमध्ये कोरोना रुग्णांसाठी अचाकन ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Assembly Election 2022 : पंजाबमध्ये निवडणुकांची घोषणा, मात्र कोरोनाची स्थिती चिंताजनक! ऑक्सिजनच्या मागणीत अचानक वाढ
ऑक्सिजन सपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 4:35 PM

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केलीय. त्यात पंजाब विधानसभा निवडणुकीचाही (Punjab Assembly Election) समावेश आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये आचारसंहिताही (Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. अशावेळी पंजाबमध्ये कोरोनाची (Punjab Corona Update) परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. कारण पंजाबमध्ये कोरोना रुग्णांसाठी अचाकन ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी फक्त 62 ते 226 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, फक्त 24 तासात ही संख्या 264 वर पोहोचली आहे. 1 जानेवारीला फक्त 23 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज भासली होती. दरम्यान, शुक्रवारी पंजाबमध्ये 2 हजार 901 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शनिवारी ही संख्या 3 हजार 643 वर पोहोचली आहे. 1 जानेवारीच्या कोरोना अहवालानुसार ही संख्या केवळ 332 होती.

रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनच्या मागणीत अचानक वाढ

सुरुवातीला फक्त 3 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती. शुक्रवारी ही संख्या 55 वर पोहोचली आहे. ही वाढ तब्बल 175 टक्के इतकी आहे. या दरम्यान व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 6 ते 11 झाली आहे. 1 जानेवारीला एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हता, फक्त 8 रुग्ण हे लेव्हल 3 सपोर्टवर होते. राज्याचा रुग्णावाढीचा दर शुक्रवारी 11.75 टक्के होता, तो शनिवारी 14.64 टक्क्यांवर पोहोचली आहे. 1 जानेवारीला पॉझिटिव्हिटी रेट 2.02 टक्के होता. सर्वाधिक रुग्ण हे पटियालामध्ये आढळून आले होते. त्यानंतर मोहाली, लुधियाना आणि अमृतसरमध्ये होता.

30 डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पंजाबमध्ये 30 डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी पंजाबमध्ये रोज 100 पेक्षा कमी रुग्णसंख्या मिळत होती. 30 डिसेंबरला 116 रुग्ण आढळून आले. त्यानंतर सातत्याने ही रुग्णवाढ सुरु आहे. 4 जानेवारीला पंजाबमध्ये 1 हजार 4 नवे रुग्ण आढळले. तर 7 जानेवारीलाही संख्या वाढून 2 हजार 874 वर पोहोचली आहे. सध्या पंजाबमध्ये 6.17 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 16 हजार 665 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आता राज्यात 12 हजार 614 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पंजाबमधील निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार?

पंजाबमधील 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार पंजाबमध्ये 20 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी असेल. तर 31 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर अन्य राज्यांसोबत 10 मार्च रोजी पंजाबमध्ये मतमोजणी होणार आहे.

>> 8 जानेवारीला अधिसूचना जारी >> किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा >> कधी मतदान? – 14 फेब्रुवारी >> निकाल कधी? – 10 मार्च

इतर बातम्या :

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

VIDEO | भलामोठा खडक बोटीवर कोसळला, भीषण अपघातात सात जणांना जलसमाधी

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.