Tarakeswar Election Result 2021 LIVE : विधानसभेसाठी खासदारकी सोडली, आता भाजपचा बडा उमेदवार पिछाडीवर

Tarakeswar Assembly Election Result 2021 Live Update in Marathi: बंगालच्या 294 क्रमांकाच्या तारकेश्वर विधानसभा मतदारसंघात टीएमसीने (TMC) रमेंदु सिंहा यांना तिकिट दिलंय. भाजपने या मतदारसंघातून स्वपन दास गुप्ता यांनी उमेदवारी दिलीय.

Tarakeswar Election Result 2021 LIVE : विधानसभेसाठी खासदारकी सोडली, आता भाजपचा बडा उमेदवार पिछाडीवर
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 11:32 AM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पारा चांगलाच वर चढलाय. सत्ताधारी ऑल इंडिया तृणमुल काँग्रेसने (AITMC) तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने (BJP) देखील बंगाल काबिज करण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचाराची राळ उठवली होती. बंगालच्या तारकेश्वर विधानसभा मतदारसंघात टीएमसीने (TMC) रमेंदु सिंहा यांना तिकिट दिलंय (Tarakeswar Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Tarakeswar Assembly TMC MLA Rachhpal Singh Latest News in Marathi)

भाजपने या मतदारसंघातून स्वपन दास गुप्ता यांनी उमेदवारी दिलीय. मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPIM) या मतदारसंघातून सुरजीत घोष यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. तारकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकूण 5 उमेदवार निवडणुकीत आपलं भविष्य आजमावत आहेत. 294 विधानसभा मतदारसंघ असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेचा जादुई आकडा 148 आहे.

स्वपन दासगुप्ता पिछाडीवर

बंगालमधील विधानसभा जागेसाठी राज्यसभेची खासदारकी सोडणारे भाजपचे स्वपन दासगुप्ता हे तारकेश्वर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहे. तृणमूलचे उमेदवार रामेंदु सिंहाराय यांनी पाच हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे.

स्वपन दासगुप्ता हे बंगालच्या राजकारणातील मोठा चेहरा आहेत. ते राज्यसभेचे नामांकित सदस्य होते. मोठ्या वादानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन बंगालमध्ये विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता.

  2016 मधील निवडणूक लढत

तारकेश्वर विधानसभा मतदारसंघ पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात येतो. या जागेवर मागील दोन पंचवार्षिक सत्ताधारी टीएमसीने विजय मिळवलाय. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचे रछपाल सिंह येथून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरजीत घोष यांचा 27 हजार 690 मतांच्या फरकाने पराभव केला होता. रछपाल सिंह यांना 97 हजार 588 मतं मिळाली होती. सुरजीत घोष यांना 69 हजार 898 मतं मिळाली होती.

एकूण मतदारांची संख्या

मागील पंचवार्षिकला भाजप या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होता. भाजप उमेदवाराला 17 हजार 989 मतं मिळाली होती. 2016 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 21 हजार 972 होती. यामध्ये एकूण 1 लाख 92 हजार 351 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात एकूण 269 बूथ तयार करण्यात आले होते. त्यावेळी 86 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार झालं होतं.

या मतदारसंघात पहिल्यांदा 1952 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. नंतरच्या निवडणुकीतही काँग्रेसचाच दबदबा राहिला. या मतदारसंघात टीएमसीला पहिल्यांदा 2011 मध्ये विजय मिळवला होता.

मागील निवडणुकीतील आकेडवारी

सध्याचे आमदार : रछपाल सिंह एकूण मिळालेली मतं : 97588 एकूण मतदार : 221972 मतदानाची टक्केवारी : 86.66 फीसदी एकूण उमेदवार : 4

हेही वाचा :

कोरोनाचा कहर सुरुच, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचं निधन, ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्त

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार

West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच

व्हिडीओ पाहा :

Tarakeswar Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Tarakeswar Assembly TMC MLA Rachhpal Singh Latest News in Marathi

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.