UP Election 2022 Phase 4 Voting Live Updates: निवडणुकांचा चौथा टप्पा, कुठे किती टक्के मतदान?

| Updated on: Feb 23, 2022 | 7:49 PM

UP Vidhan Sabha Election 2022 Phase 4 Voting and Poll Percentage updates: उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 9 जिल्ह्यातील 59 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. 59 विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 624 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

UP Election 2022 Phase 4 Voting Live Updates: निवडणुकांचा चौथा टप्पा, कुठे किती टक्के मतदान?

UP Vidhan Sabha Election 2022 Phase 4 Voting and Poll Percentage updates : उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला (Uttar Pradesh Elections) सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 9 जिल्ह्यातील 59 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 59 विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 624 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. दरम्यान चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. माझे सर्वांना आवाहान आहे की मतदान (Voting) करून लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Feb 2022 06:57 PM (IST)

    सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.47 टक्के मतदान

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.47 टक्के मतदान झाले आहे.

    कुठे किती टक्का मतदान?

    पीलीभीतमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.33 टक्के मतदान झाले आहे.

    लखीमपूर खेरी येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.42 टक्के मतदान झाले आहे.

    सीतापूरमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.39 टक्के मतदान झाले आहे.

    हरदोईमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान झाले आहे.

    उन्नावमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.05 टक्के मतदान झाले आहे.

    लखनौमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.08 टक्के मतदान झाले आहे.

    रायबरेलीमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.40 टक्के मतदान झाले आहे.

    बांदा येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान झाले आहे.

    फतेहपूरमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.02 टक्के मतदान झाले आहे.

  • 23 Feb 2022 05:15 PM (IST)

    दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?

    पिलीभीतमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 54.83 टक्के मतदान झाले आहे.

    लखीमपूर खेरीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 52.92 टक्के मतदान झाले आहे.

    सीतापूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 50.33 टक्के मतदान झाले आहे.

    हरदोई येथे दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.२९ टक्के मतदान झाले आहे.

    उन्नावमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत 47.29 टक्के मतदान झाले आहे.

    लखनौमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 47.62 टक्के मतदान झाले आहे.

    रायबरेलीमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत 50.84 टक्के मतदान झाले आहे.

    दुपारी 3 वाजेपर्यंत बांदा येथे 50.08 टक्के मतदान झाले आहे.

    फतेहपूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 52.60 टक्के मतदान झाले आहे.

  • 23 Feb 2022 04:40 PM (IST)

    उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत 49.89 टक्के मतदान

    उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत 49.89 टक्के मतदान

    सर्वाधिक मतदान पीलीभीतमध्ये झालंय, 54.83 टक्के मतदानाची नोंद

    लखीमपूर खेरीमध्ये 52.92 टक्के मतदान

    सीतापूरमध्ये 50.33 टक्के मतदान

  • 23 Feb 2022 02:05 PM (IST)

    युपीमध्ये एक वाजेपर्यंत 37.45 टक्के मतदान

    उत्तर प्रदेशमध्ये आज विधानसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. एक वाजेपर्यंत 37.45 टक्के एवढे मतदान झाले आहे. पीलीभीत मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे.

  • 23 Feb 2022 12:25 PM (IST)

    उन्नवमध्ये सकाळी आकरापर्यंत 22.45 टक्के मतदान

    उन्नवमध्ये सकाळी आकरा पर्यंत 22.45 टक्के मतदान, तर हरदोईमध्ये 20.27 टक्के मतदान झाले आहे. दुसरीकडे पीलीभीतमध्ये सर्वाधिक 27.43 टक्के मतदानाची नोंद झाली.

  • 23 Feb 2022 11:30 AM (IST)

    उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा भाजपाचे सरकार - राजनाथ सिंग

    उत्तरप्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लखनऊमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पुन्हा एकदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपाचाच विजय होईल असा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे. या वेळी बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, 2017 मध्ये आम्हाला जसे उत्तरप्रदेशमध्ये बहुमत मिळाले होते, तसाच विजय यावेळी देखील होईल. जनता पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवेल.

  • 23 Feb 2022 09:19 AM (IST)

    पीठासीन अधिकाऱ्यावर समाजवादी पार्टीचा आरोप

    उन्नाव जिल्ह्यातील पूर्वा विधानसभेच्या 167 बूथ क्रमांकाच्या पीठासीन अधिकाऱ्यावर समाजवादी पार्टीच्या वतीने आरोप करण्यात आला आहे. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना पीठासीन अधिकारी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. याची निवडणूक आयोगाने  गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील सपाच्या वतीने करण्यात आली आहे.

  • 23 Feb 2022 08:07 AM (IST)

    हजरतगंजमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

    आज उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष: हजरतगंज सारख्या सेंसीटीव्ह मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी राघवेंद्र मिश्रा यांनी दिली.

  • 23 Feb 2022 08:01 AM (IST)

    मायावतींनी केले मतदान

    उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून, बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी लखनऊमध्ये मतदान केले.

Published On - Feb 23,2022 7:55 AM

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.