उत्तराखंडमध्ये राहुल गांधींचा हंटर, एक परिवार, एक तिकीट धोरण लावणार, रावतांसह बड्या नेत्यांना झटका

आताच्या विधानसभा निवडणुकीतही स्वत: आणि सोबत स्वत:च्या पोराबाळांना तिकीट देण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालंय. त्यात खुद्द मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसचे दावेदार हरिश रावत यांचाही समावेश आहे. राहुल गांधींच्या निर्णयाचा त्यांनाही फटका बसताना दिसतोय.

उत्तराखंडमध्ये राहुल गांधींचा हंटर, एक परिवार, एक तिकीट धोरण लावणार, रावतांसह बड्या नेत्यांना झटका
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 12:47 PM

राहुल गांधी  (Rahul Gandhi)हे काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी पक्षातले महत्वाचे निर्णय तेच घेतात हे आता लपून राहीलेलं नाही. त्यामुळे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच त्यांनी हंटर चालवायला सुरुवात केलीय. आणि त्याचा पहिला फटका बसलाय तो उत्तराखंडच्या काँग्रेस नेत्यांना. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Assembly Election 22) काँग्रेसचे बहुतांश नेते आता रिटायरमेंटच्या वयात आहेत आणि त्यांना चिंता आहे ती त्याच्या मुलाबाळांची. आताच्या विधानसभा निवडणुकीतही स्वत: आणि सोबत स्वत:च्या पोराबाळांना तिकीट देण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालंय. त्यात खुद्द मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसचे दावेदार हरिश रावत (Harish Rawat) यांचाही समावेश आहे. राहुल गांधींच्या निर्णयाचा त्यांनाही फटका बसताना दिसतोय.

काय आहे राहुल गांधींचा निर्णय? आता आपलंच पोरगं निवडूण येणार आणि त्याच्या मागे सत्ताही आपल्याच घरात रहाणार असा विचार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी झटका दिलाय. पक्षात परिवारवादाला आळा घालण्यासाठी एक परिवार एक तिकीट असं धोरण लागू केलंय. त्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय. उत्तराखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोंडियाल यांनी एकाच कुटुंबात अनेक तिकीट दिले जाऊ शकतात अशी वकिली केली होती. त्याचा माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी विरोध केला होता. एकाच कुटुंबात तिकीट दिल्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना उपाध्याय यांनी बोलून दाखवली होती. तोच वाद काँग्रेस हायकमांडकडे गेला आणि शेवटी एक कुटुंब, एक तिकीट असं धोरण राबवण्याचं निश्चित केलं गेलंय. विशेष म्हणजे काँग्रेसनं याआधी असं धोरण पंजाबमध्ये राबवलं होतं. त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता.

कोण कोण तिकीट मागतंय? उत्तराखंडमध्ये काँग्रेस ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवतंय ते सीनियर लीडर हरीश रावत हेच स्वत:च्या मुला मुलीसाठी तिकीट मागतायत. स्वत:ही ते निवडणूक लढवणार आहेत. आपल्याला डावललं जाणार असं वाटत असतानाच गेल्या आठवड्यात त्यांनी बंडाची भाषा करत काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. तेच तीन तिकीटांसाठी उत्सुक आहेत. त्यानंतर काँग्रेसचे सभागृह नेते प्रीतमसिंह हे सुद्धा स्वत:च्या मुलासाठी तिकीट मागतायत. पण काहींना मात्र तिकीट कन्फर्म मानलं जातंय. त्यात भाजपातून आलेले यशपाल आर्य आणि त्यांच्या मुलाला तिकीट निश्चित मानलं जातंय. प्रत्यक्षात ज्यावेळेस काही परिस्थिती निर्माण झाली तर राहुल गांधींच्या नियमात बदल होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जातेय.

हे सुद्धा वाचा : G Pay, PhonePe, Paytm ची UPI सर्व्हिस काही तास बंद, युजर्सची सोशल मीडियावर तक्रार

Yoga Poses : ‘ही’ योगासने तुम्हाला ठेवतील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर

कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.