AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021: हल्ल्यात जखमी झालेल्या 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू; शहांचा टीएमसीवर हल्लाबोल

भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी मारहाण झाल्याने जखमी झालेल्या त्यांच्या मातोश्री शोभा मजूमदार यांचं निधन झालं आहे. (BJP slams TMC over death of 85-year-old woman)

West Bengal Election 2021: हल्ल्यात जखमी झालेल्या 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू; शहांचा टीएमसीवर हल्लाबोल
Shova Majumadar
| Updated on: Mar 29, 2021 | 2:01 PM
Share

कोलकाता: भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी मारहाण झाल्याने जखमी झालेल्या त्यांच्या मातोश्री शोभा मजूमदार यांचं निधन झालं आहे. शोभा मजूमदार यांच्या निधनावर भाजप नेते अमित शहा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं असून राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (BJP slams TMC over death of 85-year-old woman)

शोभा मजूमदार यांच्या निधनानंतर भाजपने टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून ममता बॅनर्जी सरकारला घेरलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री देबश्री चौधरी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. एवढी मोठी घटना घडली. एका 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आणि महिला मुख्यमंत्र्याने त्यावर चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे देश स्तब्ध झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात हत्यांचं सत्रं सूरू आहे. कुणालाही अटक केली जात नाही. कोणत्याही हत्येची चौकशीही करण्यात येत नाही, असं चौधरी म्हणाले.

तर अमित शहा यांनीही मजूमदार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बंगालची कन्या शोभा मजूमदार यांच्या निधनाने दु:ख झालं. त्यांना टीएमसीच्या गुंडांनी अमानूषपणे मारहाण केली होती. मजूमदार कुटुंबाला झालेला हा घाव ममता बॅनर्जींचा पिच्छा सोडणार नाही. बंगाल हिंसामुक्त होण्यासाठी लढेल. येथील महिलांच्या सुरक्षेसाठी आमची लढाई असले. असं शहा यांनी म्हटलं आहे.

नड्डा यांचं ट्विट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. भाजप कार्यकर्ते असल्यामुळे गोपाल यांना आपल्या आईला गमवावं लागलं. त्यांचं हे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोभा या बंगालची आई होत्या, मुलगी होत्या. भाजप नेहमीच महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहील, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर 24 परगना जिल्ह्यातील निमटा येथे भाजप कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांची आई शोभा मजूमदार यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. शोभा यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती. माझा मुलगा भाजपसाठी काम करतो म्हणून त्याला मारहाण केली. मलाही धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या मुलाच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. मलाही जखमा झाल्या, असं शोभा यांनी मृत्यूपूर्वी सांगितलं होतं.

मी बोलूही शकत नाही आणि व्यवस्थित सर्व काही सांगूही शकत नाही. तीन चार लोकांनी आम्हाला अमानुषपणे मारहाण केली. त्यांनी त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी आल्या आल्या मारहाण सुरू केली. त्यामुळे आम्हाला काय होतं हे कळलं नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. (BJP slams TMC over death of 85-year-old woman)

संबंधित बातम्या:

VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला

West Bengal Election 2021: रणरणत्या उन्हात व्हीलचेअरवरून ममता बॅनर्जींचा प्रचार; नंदीग्राममध्ये रोडशो

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

(BJP slams TMC over death of 85-year-old woman)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.