West Bengal Election 2021: शेवटच्या तीन टप्प्यात भाजपसोबत ‘खेला’?; कोरोनामुळे मतदारांचा ममतादीदींना कौल?; वाचा सविस्तर

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (West Bengal Election Results 2021: analysis of west bengal election 2021)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:40 PM, 2 May 2021
West Bengal Election 2021: शेवटच्या तीन टप्प्यात भाजपसोबत 'खेला'?; कोरोनामुळे मतदारांचा ममतादीदींना कौल?; वाचा सविस्तर
Mamata Banerjee

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. मतदानाच्या शेवटच्या तीन टप्प्यात भाजपसोबत खेला झाल्याचं बोललं जात असून बंगालसह देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने बंगालच्या मतदारांनी शेवटच्या तीन टप्प्यात ममतादीदींच्या बाजूने कौल दिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (West Bengal Election Results 2021: analysis of west bengal election 2021)

भाजपच्या बंगालमधील पराभवामागे अनेक कारणं असून कोरोनाचं वाढतं संकट हे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे. बंगालमधील कोरोनाच्या केसेस वाढू लागल्यानेच सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यातील मतदानावेळी मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून मतदान केलं. 2 वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यानुसार या तीन टप्प्यातील मतदारसंघांमध्येच प्रचंड मते मिळाल्याचं दिसून आलं आहे. या कलानुसार या तीन टप्प्यातील मतदारसंघातील 75 जागा टीएमसीच्या पारड्यात जाताना दिसत आहे. तर 36 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. देशात आणि बंगालमध्ये कोरोनाचं प्रचंड संकट निर्माण झालं होतं. देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली होती. वैद्यकीय सुविधा नसल्याने लोकांचा मृत्यू होत होता. त्याच काळात या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. हे मतदान भाजपविरोधी होतं, असं स्पष्ट होऊ लागलं आहे.

सहाव्या टप्प्यातील खेला

20 एप्रिलपर्यंत बंगालमध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. बंगालमध्ये दिवसाला 10 हजाराच्यावर रुग्ण सापडत होते. 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यासाठी मतदान होते. बंगालमध्ये त्या दिवशी 11,984 कोरोना रुग्ण सापडले होते. केंद्रात भाजप असतानाही कोरोना रोखला जात नसल्याचा मेसेज जनतेत गेला. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांनी ममता दीदींच्या पारड्यात मतदानाचं दान टाकलं. या टप्प्यात उत्तर बंगालच्या उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण बंगालमध्ये नदिया, दक्षिण 24 परगना आणि पूर्वी बर्दवानच्या 43 जागांवर मतदान झालं होतं. दक्षिण 24 परगनामध्ये 17, उत्तरी दिनाजपूर आणि नदियामध्ये 9 आणि पूर्व बर्दवानच्या 8 जागांवर मतदान झालं होतं. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने या जागांवरील 43 जागांपैकी 33 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस 6, भाकप 3 आणि फॉरवर्ड ब्लॉकला एका जागेवर विजय मिळाला होता. हाती आलेल्या कलावरून या जागांवर ममता बॅनर्जी यांना पुन्हा बहुमत मिळताना दिसत आहे.

सातव्या टप्प्यातील खेला

26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागांवर मतदान झालं. त्यावेळी राज्यात कोरोनाचे 15,992 रुग्ण सापडले होते. या टप्प्यात पाच जिल्ह्यात मतदान झालं होतं. त्यात दक्षिण दिनाजपूर, मालदा (6 जागा), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (4) आणि पश्चिम बर्दवान (9) आदी जागांचा समावेश होता. कोरोनामुळे या मतदारसंघातही मतदारांनी भाजपला नाकारले. परंतु, या मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 40 टक्के आहे. हा संपूर्ण मतदार ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आलेला दिसत आहे. आकडेवारीनुसार या मतदारसंघांमध्ये 40 टक्के मुस्लिम, 18 टक्के दलित, 6 टक्के आदिवासी मतदार आहेत. या टप्प्यातील 26 मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या 20 टक्के आहे. तर 18 जागांवर एससीची हिस्सेदारी समान आहे.

आठव्या टप्प्यातील खेला

पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिल रोजी आठव्या टप्प्यासाठी मतदान झालं होतं. या शेवटच्या टप्प्यात 35 जागांवर मतदान झालं होतं. त्यात मालदा (6), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (7) आणि बीरभूम (11) जागांचा समावेश आहे. जंगीपूर और शमशेरगंजमधील दोन उमेदवारांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने या ठिकाणी 16 मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 2016 विधानसभा निवडणुकीत टीएमसीने येथील 35 जागांपैकी 17 जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने 13 जागांवर आणि भाजपने एक तसेच भाकपने तीन आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र यावेळी डावे आणि काँग्रेसच्या जागा टीएमसीच्या खात्यात जाताना दिसत आहेत. या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. मात्र, भाजपला ज्या पद्धतीने विजय हवा होता, तसा विजय न मिळाल्याने भाजपमध्ये नैराश्य पसरलं आहे. (West Bengal Election Results 2021: analysis of west bengal election 2021)

 

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results 2021 LIVE: नंदिग्राममधून ममता बॅनर्जी आघाडीवर; सुवेंदू अधिकारी 3800 मतांनी मागे

Belgaum Election Result 2021 LIVE | सतीश जारकीहोळींना पुन्हा मोठी आघाडी, मंगला अंगडी पिछाडीवर

West Bengal Election Results: शरद पवार- तेजस्वी यादवांचं ट्विट, आता संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना फोन

(West Bengal Election Results 2021: analysis of west bengal election 2021)