AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना पुढं दिशा पाटनी फेल, ‘ऊंचा लंबा कद’च्या नवीन वर्जन रिलीज, गाणं पाहून चाहते नाराज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि दिशा पाटनी यांचं 'वेलकम टू द जंगल'मधील नवीन गाणं 'ऊंचा लंबा कद' चं नवीन वर्जन रिलीज करण्यात आलं आहे. गाणं पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कतरिना पुढं दिशा पाटनी फेल, 'ऊंचा लंबा कद'च्या नवीन वर्जन रिलीज, गाणं पाहून चाहते नाराज
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 01, 2026 | 5:22 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. दरम्यान, आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील ‘ऊंचा लंबा कद फॉरएव्हर’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये नेले आहे. विशेष म्हणजे, गाण्याच्या शेवटी अभिनेता अक्षय कुमारने कतरिनाची घेतलेली आठवण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सोमवारी प्रदर्शित झालेले ‘ऊंचा लंबा कद फॉरएव्हर’ हे गाणे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या Welcome या चित्रपटातील लोकप्रिय ‘ऊंचा लंबा कद’ गाण्याचे रीमिक्स व्हर्जन आहे. मूळ गाण्यात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची जोडी झळकली होती. त्या गाण्यातील कतरिनाचे डान्स मूव्ह्ज आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

नव्या व्हर्जनमध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री दिशा पटानी दिसत आहे. दुबईमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघांनी आकर्षक डान्स परफॉर्मन्स सादर केला आहे. मात्र, गाण्याच्या शेवटी अक्षय कुमारने कतरिना आम्हाला तुझी आठवण येतेय असे म्हणत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

चाहत्यांना जाणवली कतरिनाची उणीव

गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी नव्या गाण्याचे कौतुक केले असले तरी कतरिनाची कमतरता स्पष्टपणे जाणवल्याचे मत व्यक्त केले. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, दिशाविषयी कोणतीही नाराजी नाही, पण कतरिनाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर दुसऱ्या एका युजरने ओरिजिनल गाणेच सर्वोत्तम होते असे लिहिले. आणखी एका नेटकऱ्याने बॉलिवूडमध्ये नवीन कल्पना संपल्या आहेत का? सतत जुन्याच गाण्यांचे रीमिक्स केले जात आहेत अशी टीकाही केली.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या शीर्षक गीताच्या रीमिक्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ‘घिस घिस घिस’ आणि ‘ऊंचा लंबा कद फॉरएव्हर’ या गाण्यांनाही चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तिहेरी संगम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मोठी स्टारकास्ट झळकणार आहे.

Follow Us
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड