Picasso : वडील आणि मुलाच्‍या नात्याची कथा सोबतच कोकणातल्या लोकजीवनाची झलक, ‘पिकासो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मराठी चित्रपट 'पिकासो'चा ट्रेलर रिलीज केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर 19 मार्च 2021 रोजी होणार आहे. (A glimpse of the father-son relationship as well as a glimpse of Konkan folklore, trailer release of 'Picasso')

  • Updated On - 4:11 pm, Wed, 17 March 21
Picasso : वडील आणि मुलाच्‍या नात्याची कथा सोबतच कोकणातल्या लोकजीवनाची झलक, ‘पिकासो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


मुंबई : अमेझॉन प्राइम व्हिडिओनं त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर रीलीज केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर 19 मार्च 2021 रोज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे (Samay Sanjeev Tambe) आणि अश्विनी मुकदाम (Ashwini Mukadam) अभिनीत चित्रपट ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडील आणि मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते. (A glimpse of the father-son relationship as well as a glimpse of Konkan folklore, trailer release of ‘Picasso’)

शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित ‘पिकासो’

शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन आणि सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग, तसेच सह-लेखक तुषार परांजपे  यांनी केलं आहे. भारत, 240 देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य 19 मार्च 2021 पासून मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकणार आहेत.

पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग यांची प्रतिक्रिया

चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ‘मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्‍हणजे स्‍वत:लाच प्रश्‍न विचारत समस्‍यांचा सामना करण्‍याच्‍या नवीन पद्धतींचा शोध घेणे.’

पाहा चित्रपटाचा ट्रेलर

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून तिने अलिकडील दशकामध्‍ये अनेक उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत. ‘पिकासो’ हा असाच एक चित्रपट आहे, जो सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल. प्‍लॅटून वन फिल्‍म्‍समधील आमच्‍या संपूर्ण टीमला अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत सहयोग करण्‍याचा आणि आमच्‍या स्‍वत:च्‍या लहानशा प्रयत्‍नामध्‍ये आणि त्यांच्या वैविध्‍यपूर्ण कथानकांमध्ये ‘पिकासो’ सारख्या कथांचे योगदान देण्‍याचा आनंद होत आहे. मी भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील स्ट्रिमिंग सर्विसवर या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमिअर सादर होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.’

संबंधित बातम्या

Mouni Roy Wedding | मौनी रॉय लवकरच अडकणार लग्न बंधनात, मंदिरा बेदीच्या घरी पार पडली बैठक!

Rakhi Sawant Biopic | आलिया की प्रियंका, कोण साकारेल राखीची भूमिका? ‘ड्रामा क्वीन’ने दिले उत्तर…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI