इरफान खानचा फोटो होता म्हणून…!

बॉलिवूड अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचे (29 एप्रिल) वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले आहे. मात्र, इरफान खान या जगात नसून देखील त्याच्या एका फोटोमुळे 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचे लाखो रुपये परत मिळाले आहेत.

इरफान खानचा फोटो होता म्हणून...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचे (29 एप्रिल) वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले आहे. मात्र, इरफान खान या जगात नसून देखील त्याच्या एका फोटोमुळे 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचे लाखो रुपये परत मिळाले आहेत. ही घटना आहे मुंबईची…. शांतीदेवी पांडे यांची…ही महिला गोरेगावच्या मोतीलाल नगरहून मालाड पश्चिमकडे एका रिक्षातून जात होती. याचवेळी रिक्षातून उतरत असताना गडबडीमध्ये या महिलेची पर्स रिक्षामध्येच राहिली आणि याच पर्समध्ये महिलेचे 1 लाख 55 हजार रूपये होते. (A photo of Irrfan Khan rickshaw driver gave the woman Rs 1.5 lakh in mumbai)

मात्र, रिक्षामध्ये पर्स राहिली आहे हे महिलेला ती रिक्षा गेल्यानंतर लक्षात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर या महिलेने थेट बांगुर नगर पोलिस स्टेशन गाठले. तिथे जाऊन या महिलेने सर्व घडलेल्या प्रकार तेथील पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांना सांगितला यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्या ठिकाणी एक संशयित रिक्षा दिसला परंतु रिक्षाचा नंबर दिसत नव्हता. मात्र, जो संशयित रिक्षा दिसत होता त्या रिक्षाच्या मागे अभिनेता इरफान खानचा फोटो दिसत होता. यावरून पोलिसांनी इरफान खानचा फोटो असलेल्या रिक्षाचा शोध चालू केला त्यानंतर एखाद्या चित्रपटात घडावे तसेच घडले आणि इरफान खानच्या फोटोवरून तो रिक्षाचालक पोलिसांना मिळाला.

पोलिसांच्या चौकशीत सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने महिलीची ही पर्स परत केली. दरम्यान, 11 तासांनंतर महिलेला आपली पर्स परत मिळाली. बांगुर नगर पालिसांनी तब्बल 11 तास या रिक्षाचालकाचा शोध घेतला.

संबंधित बातम्या : 

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

Irrfan Khan Died | तीन दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचे निधन, आईची शेवटची इच्छाही अपूर्ण

(A photo of Irrfan Khan rickshaw driver gave the woman Rs 1.5 lakh in mumbai)

Published On - 4:19 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI