AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने केलीये एका व्यापाऱ्याची हत्या, अनेक धक्कादायक पुरावे समोर

Salman Khan | सलमान खान याच्या घाराबाहेर गोळीबार करणारा शूटर विशाल उर्फ ​​कालू... ज्याने व्यापाऱ्याची केलीये हत्या... समोर आलेली माहिती अत्यंत भयानक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची चर्चा... आरोपींबद्दल मोठे अपडेट समोर...

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने केलीये एका व्यापाऱ्याची हत्या, अनेक धक्कादायक पुरावे समोर
| Updated on: Apr 16, 2024 | 9:14 AM
Share

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुचाकी मालकाने त्याची दुचाकी कोणाली विकली याची माहिती देखील समोर आली आहे. . गोळीबारानंतर शूटर अभिनेत्याच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर माउंट मेरी चर्चजवळ बाईक सोडून गेले होते.

दुचाकीच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या मदतीने पोलीस दुचाकीच्या मालकापर्यंत पोहोचले. दुचाकीचा मालक नवी मुंबई याठिकाणी राहतो. पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने नुकतीच त्याची बाईक कुणाला तरी विकली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य दोन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर, आरोपी वांद्रे येथील माउंट मेरी चर्च बाहेर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी बाईक सोडली आणि वांद्रे स्टेशनसाठी रिक्षा केली. त्यानंतर बोरिवली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे पोहोचले. पण सांताक्रुज स्टेशनवर उतरले आणि पुढे गेले. या जागांवर असलेल्या सीटीटीव्ही फुटेजमुळे दोघांबद्दल माहिती समोर आली आहे…

पोलीस याप्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेच्या तपासासाठी अधिक पथके तयार करण्यात आली आहेत. यापैकी काही टीम बिहार, राजस्थान आणि दिल्लीला पाठवण्यात आल्या आहेत.

शूटर्सबद्दल पोलिसांना मिळाले आहेत अनेक पुरावे

या घटनेत गोळीबार करणाऱ्यांबाबत गुन्हे शाखेला अनेक नवीन पुरावे देखील मिळाले आहेत. दोन्ही आरोपी सीसीटीव्हीत दिसत आहेत. गोळीबार करणाऱ्यांचीही ओळख पटली आहे. त्यामधील एकाचं नाव विशाल उर्फ ​​कालू असल्याचा दावा केला जात आहे. तो गुरुग्राममध्ये राहतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, एका खुनाच्या गुन्ह्यात कालू याचा फेब्रुवारीपासून शोध सुरू होता. फेब्रुवारीमध्ये त्याने याठिकाणी सचिन मुंजाल याची हत्या केली होती. पोलिसांचे एक पथकही जयपूरला पोहोचले आहे. तेथे बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड रोहितचा उजवा हात हृतिक बॉक्सरची चौकशी सुरू आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, सलमान खान याच्या जीवाला धोका असल्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.