AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चित्रपटापुढे ‘धुरंधर 2’ फेल, फक्त 4 दिवसांमध्ये केली रेकॉर्ड ब्रेक कमाई, 20 कोटी बजेटमध्ये…

फक्त चार दिवसांमध्ये 'धुरंधर 2' चित्रपटापेक्षा या चित्रपटाने जास्त कमाई करत बनवला नवीन रेकॉर्ड. फक्त 20 कोटी बजेटमध्ये केली चारपट अधिक कमाई.

या चित्रपटापुढे 'धुरंधर 2' फेल, फक्त 4 दिवसांमध्ये केली रेकॉर्ड ब्रेक कमाई, 20 कोटी बजेटमध्ये...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 24, 2026 | 12:29 PM
Share

Aadu 3 Box Office:  बॉक्स ऑफिसवर सध्या मोठ्या बजेटच्या आणि छोट्या बजेटच्या चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट गेल्या गुरुवारी प्रदर्शित झाला असून त्याने जगभरात 700 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे.

मात्र, या बिग बजेट चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेल्या एका लहान बजेटच्या मल्याळम चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘आडू 3’ या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे मोठा धमाका केला आहे.

आडू 3 ची धुरंधर 2 ला जोरदार टक्कर

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ‘आडू 3’ ने ओपनिंग वीकेंडमध्ये जगभरात सुमारे 87 कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारीही चित्रपटाने चांगली कमाई कायम ठेवत एकूण कलेक्शन 90 कोटी रुपयांच्या पुढे नेले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच चारपट कमाई करून या चित्रपटाने मोठे यश मिळवले आहे.

केरळमध्ये तर ‘आडू 3’ ने धुरंधर 2 ला मागे टाकत आघाडी घेतली आहे. या चित्रपटात जयसूर्या मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत विनायकन, विजय बाबू आणि सनी वेन यांसारखे कलाकारही झळकले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मिधुन मैनुएल थॉमस यांनी केले आहे. यामध्ये विनोद आणि फँटसीचा भन्नाट संगम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांची पसंती

‘आडू 3’ च्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मोठी स्टारकास्ट आणि प्रचंड बजेट असलेल्या चित्रपटासमोरही एक दमदार कथा आणि मनोरंजन प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचू शकते हे या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे.

जरी ‘धुरंधर 2’ ने जागतिक स्तरावर 700 कोटींचा टप्पा पार केला असला तरी ‘आडू 3’ सारख्या लहान बजेटच्या चित्रपटाने दिलेली टक्कर ही चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. विशेषतः केरळ बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठ्या चित्रपटालाही मागे टाकत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...