Bigg Boss 18: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री झळकणार बिग बॉसमध्ये, चर्चांना उधाण
Bigg Boss 18: 'आई कुठे काय करते’ मालिकेतील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री झळकणार बिग बॉसमध्ये, तिच्यासोबत अन्य सेलिब्रिटींची नावे देखील 'बिग बॉस 18' शोसाठी चर्चेत
Bigg Boss 18: ‘बिग बॉस मराठी’ शाचा पाचवा भाग प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु असताना हिंदी ‘बिग बॉस’च्या 18 व्या पर्वाची देखील चर्चा रंगली आहे. शोमध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसतील याची माहिती देखील समोर येत आहे. आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एक अभिनेत्री ‘बिग बॉस 18’ मध्ये झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे ‘ती’ अभिनेत्री कोण? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात देखील उपस्थित झाला असेल.
गेल्या कित्येक वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले ‘बिग बॉस 18’ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रुपाली हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्रीला पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण यावर रुपाली हिने अधिकृत घोषणा केलेली नाही.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री रुपाली भोसले ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’नंतर रुपाली हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. रुपाली हिने स्वतःच्या खेळीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि टॉप 10 पर्यंत पोहोचली. आता हिंदी ‘बिग बॉस 18’ ची चर्चा रंगली आहे.
सलमान खान याचा ‘बिग बॉस 18’
अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’च्या होस्टची धुरा सांभाळत आहे. होस्ट म्हणून देखील सलमान खान याला चाहत्यांनी डोक्यावर घेतला. आता ‘बिग बॉस 18’ मध्ये सलमान खान याच्यासोबत अब्दू रोजिक देखील शो होस्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय काही रुपाली हिच्यासोबत काही ‘बिग बॉस 18’ शोच्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल, समीरा रेड्डी, सुरभि ज्योति, पूजा शर्मा, शोएब इब्राहिम, दलजीत कौर आणि इशा कोपिकर… हे सेलिब्रिटी ‘बिग बॉस 18’ शोमध्ये झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.