AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 61 व्या आमिर खानचं तिसरं लग्न कधी कुठे आणि कसं होणार लग्न? मोठी माहिती समोर

आभिनेता आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी, पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता अभिनेता तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. वायाच्या 61 व्या वर्षी आमिर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे

वयाच्या 61 व्या आमिर खानचं तिसरं लग्न कधी कुठे आणि कसं होणार लग्न? मोठी माहिती समोर
Aamir Khan
| Updated on: Jun 20, 2026 | 2:53 PM
Share

Aamir Khan – Gauri Spratt Wedding : अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट आणि तीन मुलांचा बाप असलेला आमिर खान आता तिसरं लग्न करणार आहे. याआधी आमिर याने स्वतःच्या वाढजदिवशी गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. आता अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी लग्नबंधनात अडकतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, नुकताच झालेल्या एक मुलाखतीत अभिनेत्याने लग्नाबद्दल मोठे अपडेट्स दिले आहे. आमिर खान आणि गौरी यांचं लग्न साध्या पद्धतील 5 जुलै रोजी पार पडणार आहे…

आमिर खान यांने सांगितल्यानुसार, गौरी हिच्यासोबत आमिर याचं लग्न थाटामाटत होणार नाही… अत्यंत साधेपणाने दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. मुलाखतीत आमिर म्हणाला, ‘आम्ही घरीच साधेपणाने लग्न करणार आहोत. या लग्नात फक्त दोघांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र असणार आहेत. आम्हाला दोघांना साधेपणात लग्न करायचं आहे… मी सध्या अमेरिकेत आहे. त्यामुळे घरी परतल्यानंतर लग्न होईल…’ असं देखील अभिनेता म्हणाला आहे.

सांगायचं झालं तर आता आमिर याच्या लग्नासाठी फक्त 2 आठवडे उरले आहेत, त्यामुळे अभिनेत्याने कामातून देखील ब्रेक घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. तर गेल्या 25 वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखतात. आमिर खानने 2025 मध्ये त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याची घोषणा केली होती. आता 61 व्या वर्षी अभिनेता तिसरं लग्न करणार आहे.

आमिर खान याचे पहिली दोन लग्न

अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. रिना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. आमिर आणि रिना यांना दोन मुलं देखील आहेत.

आमिर खान याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. लग्नानंतर किरण हिने सरोगोसीच्या माध्यमातून मुलाचं जगात स्वागत केलं. किरण आणि आमिर यांच्या मुलाचं नाव आझाद असं आहे. पण आमिर आणि किरण यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला