AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या दोन पत्नींना विचारा मी किती रोमँटिक… आमिर हे काय म्हणाला ?

‘अरे तुम क्या प्यार करोगे, जैसा कभी हमने किया था...’ असं म्हणण्याची वेळ आता आमिर खानने तरुण मंडळींवर आणली आहे. आजच्या प्रॅक्टिकल जमान्यात साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्याने ‘मी किती रोमँटिक’ या प्रश्नावर उत्तर दिलं आणि भल्या भल्या तरुण मंडळींनाही लाजवेल असं काहीतरी बोलून गेला. नेमकं काय म्हटला, जाणून घेऊया.

‘माझ्या दोन पत्नींना विचारा मी किती रोमँटिक... आमिर हे काय म्हणाला ?
आमिर खान
| Edited By: | Updated on: Jan 11, 2025 | 9:31 AM
Share

कुछ होश नहीं रहता कुछ ध्यान नहीं रहता इंसान मोहब्बत में इंसान नहीं रहता … असं म्हटलं जातं.  प्रेमाला वय नसतं, प्रेम हे आंधळं असतं, अशा अनेक सुरस, गोड गोड किंवा प्रेमवेड्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. पण, आजच्या प्रॅक्टिकल जमान्यात साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्याने ‘मी किती रोमँटिक’ या प्रश्नावर उत्तर दिलं आणि भल्या भल्या तरुण मंडळींनाही लाजवेल असं काहीतरी बोलून गेला. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून आपला आमिर खान आहे.

आमिर खानने मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची कन्या खुशी कपूर यांच्या ‘लवयापा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली. या चित्रपटासाठी आमिरने दोघांचेही अभिनंदन केले. या कार्यक्रमात आमिर खान प्रेमाबद्दल बरंच काही बोलून गेला.

यावेळी आमिर खानने प्रेमावर आपलं मन मोकळं केलं. आमिर खान असंही म्हणाला की, तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक आहे. हे तुम्ही त्याच्या दोन्ही एक्स पत्नींना विचारू शकता. आमिर खानने ‘लवयापा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला प्रेमावर भाष्य केलं आणि मग काय भले भले अवाक झाले. या अभिनेत्याने नेमकं काय म्हटलं आहे. चला जाणून घेऊया.

आमिर खान प्रेमाबद्दल काय म्हणाला?

आमिर खान म्हणाला, ‘मी खूप रोमँटिक माणूस आहे. हे खूप मजेशीर वाटते परंतु माझ्या दोन पत्नींना विचारा. म्हणूनच माझे सर्व आवडते सिनेमे रोमँटिक आहेत. मी रोमँटिक सिनेमांमध्ये हरवून जातो. माझा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. आयुष्यात जसजसे आपण पुढे जात आहोत, तसतशी आपली प्रेमाबद्दलची समज वाढत चालली आहे. तुम्ही आयुष्य, माणसं, स्वत:ला समजून घेता. जसजसा मी मोठा होत आहे, तसतसे माझ्यात काय त्रुटी, चुका आहेत हे माझ्या लक्षात आले आहे आणि मी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आज, माझ्यावरील प्रेमाचा अर्थ असा आहे की ज्याला आपण आरामदायक आहात आणि आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचला आहात असे आपल्याला वाटते. जेव्हा मला अशी व्यक्ती सापडेल, तेव्हा मी स्वतःला कनेक्ट करू शकेन.’

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाचा ट्रेलर 10 जानेवारीला रिलीज झाला आहे. खुशी कपूर जुनैद खानसोबत ‘लवयापा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आमिर भावूकही होताना दिसला.

‘लवयापा’ कधी प्रदर्शित होणार?

‘लवयापा’ हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आशुतोष राणा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात जेन-झेड जोडप्याची लव्हस्टो

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.